केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १४ ऑक्टोबरला गोवा भेटीवर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १४ ऑक्टोबर या दिवशी दोन दिवसांच्या गोवा भेटीवर येणार आहेत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात भक्तीपूर्ण वातावरणात साजरा !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस भाद्रपद अमावास्येला, म्हणजेच ६ ऑक्टोबर २०२१ या दिवशी आश्रमातील साधकांनी कृतज्ञताभावात साजरा केला.

गोवा पोलिसांच्या ‘सायबर’ गुन्हे विभागात पहिली अत्याधुनिक ‘सायबर फॉरेन्सिक’ प्रयोगशाळा कार्यान्वित

गोवा पोलिसांच्या ‘सायबर’ गुन्हे विभागात गोव्याची पहिली अत्याधुनिक ‘सायबर फॉरेन्सिक’ प्रयोगशाळा अखेर कार्यान्वित झाली आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाही गोव्यात नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार

राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीची मात्रा (डोस) सर्व पात्र नागरिकांनी घेतल्याचा दावा शासनाकडून केला जात आहे, तसेच राज्यात कोरोनाचा संसर्ग अल्प होत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने सण-उत्सव साजरे करण्यासाठीचे निर्बंध हटवले आहेत.

भाजपच्या विद्यमान सर्व आमदारांना उमेदवारी मिळणार नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

भाजपच्या विद्यमान काही आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही.

कळंगुट येथे टोळीयुद्धामध्ये १ जण गंभीररित्या घायाळ, तर ४ कुख्यात गुन्हेगार पोलिसांच्या कह्यात

कळंगुट येथे ५ ऑक्टोबरच्या रात्री झालेल्या टोळीयुद्धात तलवारीने केलेल्या आक्रमणात एक जण गंभीररित्या घायाळ झाला. पोलिसांनी या प्रकरणी कुख्यात गुन्हेगार टारझन पार्सेकर (रहाणारा नागोवा) याला कळंगुट येथून, तर इम्रान बेपारी, सूर्यकांत कांबळी आणि सुरज शेट्ये यांना गोव्यातून पलायन करत असतांना…

गोव्याला अमली पदार्थांचे सेवन करणार्‍या पर्यटकांची आवश्यकता नाही ! – मनोहर आजगावकर, उपमुख्यमंत्री

कॉर्डेलिया क्रूझवरील केंद्रीय अमली पदार्थ विभागाच्या धाडीमध्ये हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेकांना कह्यात घेतल्यानंतर त्यांच्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक माहिती उघड होत आहे. या क्रूझवरील पार्टीचे गोवा हे केंद्रस्थान होते.

मये भूविमोचन कृती समिती विधानसभेची निवडणूक लढवणार

मये येथील स्थलांतरित मालमत्ता प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी शासनाने कायदा करूनही स्थानिकांना अद्याप भूमीचे हक्क मिळालेले नाहीत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सरकार यांच्याकडून केवळ आश्वासनेच मिळत आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक यंत्रणा गतीमान : मतदार सूचींच्या पुनर्निरीक्षणाचे वेळापत्रक घोषित

वर्ष २०२२ मध्ये जानेवारी मासाच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अमली पदार्थ व्यवसायाच्या विरोधात कठोर कारवाई करा ! – आलेक्स रेजिनाल्ड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी गोव्यातील अमली पदार्थ व्यवसाय आणि नियमांचे उल्लंघन करणारे पर्यटक यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.