पणजी आणि मडगाव येथे २४ घंट्यांत १० सेंटीमीटर पावसाची नोंद

दक्षिण गुजरात तट आणि उत्तर कोकण ठिकाणच्या उत्तर-पूर्व अरबी समुद्रात वादळ निर्माण झाल्याने २ डिसेंबरलाही उत्तर आणि दक्षिण गोव्यातील काही ठिकाणी मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

एका मंत्र्याचा ‘सेक्स स्कँडल’मध्ये सहभाग असल्याचा काँग्रेसने आरोप केल्यानंतर भाजपची गाभा समितीची बैठक वादळी

विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने भाजपची प्रतिमा मलीन होऊ नये, यासाठी संबंधित मंत्र्याला मंत्रीमंडळातून त्वरित काढून टाकावे, अशी मागणी पंचायतमंत्री आणि अनिवासी भारतीय आयुक्तांनी बैठकीत केली.

भारतीय संस्कृती आणि परंपरा यांवर आधारित चित्रपटनिर्मितीसाठी चित्रपट निर्मात्यांना साहाय्य करणार ! – अनुराग सिंह ठाकूर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री

केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणाले, ‘‘भारतात अनेक भाषा आहेत आणि यांद्वारे आम्ही जगाला आकर्षण वाटेल अशा अनेक गोष्टी दाखवू शकतो.’’

गोव्यातील एक मंत्र्याचा ‘सेक्स स्कँडल’मध्ये सहभाग !

हे खरे असल्यास केवळ मंत्रीमंडळातून काढण्याची मागणी का ? संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस का करत नाही ? तसेच पोलिसांत पुराव्यांनिशी तक्रार का केली जात नाही ? या गोष्टी न केल्यामुळे ‘केवळ राजकीय स्वार्थासाठी असे आरोप केले जातात’, असे जनतेला वाटणे साहजिक !

जुने गोवे येथील वादग्रस्त बांधकाम बंद करण्याचा जुने गोवे पंचायतीचा आदेश

जुने गोवे येथील वारसा स्थळाजवळील वादग्रस्त बांधकाम त्वरित थांबवण्याचा आदेश जुने गोवे पंचायतीने दिला आहे. जुने गोवे पंचायत मंडळाच्या ३० नोव्हेंबर या दिवशी झालेल्या बैठकीनंतर हा आदेश देण्यात आला.

(म्हणे) ‘महिलांच्या सुरक्षेसाठी ‘डॉन्स बार’ला अधिकृत मान्यता देण्यासाठी कायदा करा !’  कळंगुट येथील पोलीस निरीक्षकाची मागणी

महिलांच्या सुरक्षेच्या नावाखाली महिलांचा सहभाग असलेले ‘अनधिकृत डान्स बार’ अधिकृत करण्याची शिफारस, ही ‘रोगाहून इलाज भयंकर’ अशी नाही का ?

उत्तराखंड राज्यातील अनेक गावांतील भयाण शांतता आणि निर्मनुष्य स्थिती यांवर ‘सुनपट’ चित्रपटातून प्रकाशझोत !

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सुनपट’ या हिंदी चित्रपटातून भारतातील उत्तराखंड राज्यात गावांतील लोक गाव सोडून शहरांकडे जात असल्यामुळे गावांत किती भयाण शांतता पसरत आहे, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

कोकणी चित्रपट निर्मितीसाठी संपूर्ण सहकार्य असेल ! – सुभाष फळदेसाई, अध्यक्ष, मनोरंजन संस्था

‘डिकोस्ता हाऊस’ या चित्रपटात गोमंतकीय कलाकार असून चित्रपटाचे चित्रीकरणही गोव्यातच झाले आहे. हा चित्रपट सर्वांनी पहाणे आवश्यक आहे, असे मत मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी व्यक्त केले.

जुने गोवे वारसास्थळाजवळील बांधकाम प्रकल्पाची अनुमती मागे घेण्याचे आदेश दिले आहेत ! – बाबू कवळेकर, उपमुख्यमंत्री

याचप्रमाणे सांकवाळ येथील वारसास्थळाजवळील ख्रिस्त्यांच्या अवैध बांधकामावरही शासन कारवाई करेल का ?

छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांनी खर्‍या अर्थाने गोमंतकीय संस्कृती जोपासली ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.