पंचगंगेवर होणार्‍या आरतीसाठी हिंदुत्‍वनिष्‍ठांची उपस्‍थिती !

२३ सप्‍टेंबरला भाविकांनी प्रशासनाचे बंधन झुगारून देऊन उत्‍स्‍फूर्तपणे श्री गणेशमूर्तींचे पंचगंगेत विसर्जन केले. यानंतर पंचगंगा नदीवर प्रतिदिन सायंकाळी ६ वाजता होणार्‍या पंचगंगेच्‍या आरतीसाठी तेथील भाविक श्री. स्‍वप्‍नील मुळे यांनी सर्व हिंदुत्‍वनिष्‍ठांना आरतीसाठी उपस्‍थित राहून सहभागी होण्‍याविषयी विनंती केली.

पुणे येथील नाना-नानी उद्यानसमोरील कृत्रिम हौदाची विदारक स्‍थिती !

अत्‍यंत गढूळ पाणी आणि प्रचंड कचरा असलेला श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी ठेवलेला कृत्रिम हौद !

सोलापूर येथे छत्रपती संभाजी महाराज तलाव येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन करणार्‍या भक्‍ताची पोलिसांकडून अडवणूक !

पोलिसांनी अशा प्रकारे कायद्याची कार्यवाही कधी अन्‍य धर्मियांच्‍या सणांच्‍या प्रसंगी केली आहे का ? हिंदूबहुल देशात आणखी किती काळ हिंदूंनीच त्‍यांच्‍या धार्मिक अधिकारांची गळचेपी सहन करायची ?

छत्रपती संभाजीनगर येथे गणेशोत्सव मंडळांचा धार्मिक देखाव्यांवर भर !

गेल्या अनेक वर्षांपासून देखाव्यांची परंपरा जपणार्‍या शहरातील जुन्या गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी धार्मिक देखाव्यांवर भर दिला आहे. मंडळांनी अयोध्येतील श्रीरामाचे मंदिर, केदारनाथचा आदियोगी, चंद्रयान, शिवराज्याभिषेकाचे देखावे सिद्ध केले आहेत.

पुणे येथे गणेशोत्सवाच्या गर्दीत भ्रमणभाष चोरट्यास अटक !

जनतेला धर्मशिक्षण नसल्यामुळे गणेशोत्सवासारख्या पवित्र उत्सवातही चोरी केली जात आहे, हे दुर्दैवी !

पुणे येथे फिरत्‍या विसर्जन हौदांना नागरिकांचा अल्‍प प्रतिसाद !

‘फिरता विसर्जन हौद आला अन् निघून गेला’, अशी अवस्‍था असल्‍याने त्‍यास नागरिकांचा अधिक प्रतिसाद मिळाला नाही. विशेष म्‍हणजे अशी व्‍यवस्‍था करण्‍याची अट निविदेतही दिलेली नाही.

सातारा येथे घरगुती श्री गणेशमूर्तींचे वहात्‍या पाण्‍यात विसर्जन करण्‍याकडे भाविकांचा कल !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने संगम माहुली येथील नदीकाठी भाविकांचे प्रबोधन करण्‍यात येत होते. या प्रबोधनामुळे अनेक भाविकांनी श्री गणेशमूर्तींचे वहात्‍या पाण्‍यात विसर्जन केले.

‘निविदा संस्‍कृती’ जपण्‍यासाठीच सातारा नगरपालिकेचे कृत्रिम तलावांना प्राधान्‍य !

विसर्जनास बंदीचे फलक सातारा शहरातील नैसर्गिक जलस्रोतांच्‍या बाहेर झळकावण्‍यात आले.सातारा नगरपालिका कृत्रिम तलावांनाच प्राधान्‍य का देत आहे ? हा प्रश्‍न सातारावासियांनाही भेडसावत आहे.

शास्‍त्रसंमत विसर्जनाचा आग्रह ! Ganesh Visarjan

पर्यावरणाच्‍या नावाखाली शास्‍त्र पालन करण्‍यास सहस्रो हिंदूंना विरोध करण्‍याचे, त्‍यातून धर्महानी करण्‍याचे मोठे पाप प्रशासनाला लागत आहे, हे त्‍यांनी लक्षात घ्‍यावे. हिंदूंना प्रशासनाने केलेली त्‍यांची दिशाभूल आता कळून चुकत असल्‍याने ते स्‍वयंस्‍फूर्तीने शास्‍त्रानुसार विसर्जनाचाच आग्रह धरत आहेत, हे चांगले लक्षण आहे !

परराज्यातून आणलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती पुजून शासनाच्या एका चांगल्या योजनेची थट्टा उडवली जात आहे ! – प्रा. राजेंद्र केरकर Ganesh Visarjan

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींवर कित्येक वर्षे बंदी असूनही त्या वापरल्या जाणे प्रशासनासाठी लज्जास्पद !