सांगली येथील सांभारे श्री गणेशमूर्तीची १७ सप्टेंबरला मिरवणूक !

सांगली येथील सांभारे श्री गणेशमूर्ती

सांगली, १५ सप्टेंबर (वार्ता.) – सांगलीच्या पटवर्धन संस्थानचे राजवैद्य आबासाहेब सांभारे यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून वर्ष १८९९ मध्ये सांगली येथे त्यांच्या गावभागातील वाड्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ केला. वाड्यामध्येच त्यांनी गणेश मंदिर बांधले आणि १४ फूट उंच अन् ९ फूट रुंद अशी पांगेरीच्या लाकडापासून एक भव्य आणि सुंदर गणेशमूर्ती बनवली. जिचे वजन जवळपास दीड टन आहे. वर्ष १९५२ वर्षांपर्यंत या गणेशमूर्तीची भव्य मिरवणूक निघत होती; परंतु पुढे लहान रस्ते, वाटेत येणार्‍या विविध अडथळ्यामुळे ती मिरवणूक बंद झाली. तथापि, यंदा या गणेशोत्सवाचे १२५ वे वर्षे असल्यामुळे येत्या १७ सप्टेंबर म्हणजे अनंत चतुर्दशीला या गणेशमूर्तीची भव्य मिरवणूक निघणार आहे.