तपोभूमी येथे श्री दत्तजयंतीच्या निमित्ताने श्री दत्त भिक्षा-शिधा समर्पण विधी

श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठ येथून श्री दत्तजयंती महोत्सवाचे Shree Datta Padmanabh Peeth या ‘फेसबूक पेज’वरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. भाविकांची याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पीडितांचे दुःख निवारून त्यांना विविध अनुभूती देणारे साखळी येथील दत्त देवस्थान !

सांखळी येथील लक्ष्मण म्हाळू कामत या दत्तभक्ताला स्वप्नदृष्टांंत होऊन दत्त महाराजांनी जे आश्‍वासन दिले होते, ते पूर्ण करून दत्त महाराज वास्तव्यास आले, ते म्हणजे सांखळी येथील प्रसिद्ध दत्त देवस्थान !

श्री क्षेत्र दत्तवाडी, केपे येथील श्री दत्तजयंती उत्सव !

यंदा २८ डिसेंबरला २४ घंट्यांच्या अखंड नामस्मरण सप्ताहास प्रारंभ झाला असून २९ डिसेंबरला सकाळी ११ वाजता त्याची सांगता होईल. यावर्षी दत्तजयंतीचा उत्सव कै. शशिकांत महादेव नाईक, कुंकळ्ळी यांच्या कुटुंबियांकडून साजरा केला जाणार आहे.

कुठ्ठाळी येथील श्री दत्तगुरु देवस्थान

झुवारी पुलाच्या जवळ असलेले गाव कुठ्ठाळी येथे श्री गुरुदेव दत्ताचे मंदिर आहे. या मंदिरात २९ डिसेंबर या दिवशी सायं. ५.३० वाजता श्री दत्तजन्म उत्सव साजरा करण्यात येणार आहे, तर ३० डिसेंबर या दिवशी दुपारी १२ वाजता श्री सत्यदत्त व्रत पूजा असणार आहे.

कोटी कोटी प्रणाम !

• बेती (गोवा) येथील श्री शांतादुर्गा पिळर्णकरीण देवीचा आज जत्रोत्सव !
• कुंडई (गोवा) येथील श्री नवदुर्गादेवीचा आज जत्रोत्सव !

बेती (गोवा) येथील श्री शांतादुर्गा पिळर्णकरीण देवीचा जत्रोत्सव

गोव्यातील बेती गावची ग्रामदेवी श्री शांतादुर्गा पिळर्णकरीण हिचे मंदिर हे जागृत देवस्थान आहे. ती नवसाला पावणारी देवी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या निमित्ताने देवस्थानची माहिती आपण थोडक्यात पाहूया.

कुंडई येथील जागृत श्री नवदुर्गादेवीचा जत्रोत्सव

श्री नवदुर्गा देवस्थान हेे कुंडई गावचे आराध्य ग्रामदैवत ! या देवस्थानच्या सर्व चालीरिती, देवकृत्ये, तसेच वार्षिक उत्सवाची देखभाल या गोष्टी गावकरी मोठ्या उत्साहाने करत असतात. या देवालयाचा जीर्णोद्धार कुंडई ग्रामसंस्थेकडून १९१० या वर्षी झाला. कुंडईत श्री नवदुर्गेची स्थापना झाल्यापासून सर्वजण तिलाच ग्रामदैवत मानू लागले.

कोटी कोटी प्रणाम !

• सांदीपनिऋषि जयंती • एळवटी येथे आज श्री सत्यनारायण पूजा
• विर्नोडा, पेडणे येथे आज श्री नारायणदेवाचा जत्रोत्सव
• पडेल (सिंधुदुर्ग) येथील श्री भावकादेवीचा आज जत्रोत्सव
• वेंगुर्ला तालुक्यातील वजराट गावच्या श्री सातेरीदेवीचा आज जत्रोत्सव

विर्नोडा, पेडणे येथे आज श्री नारायणदेवाचा जत्रोत्सव

आज विर्नोडा गावातील श्री नारायणदेवाचा जत्रोत्सव वैशिष्ट्यपूर्णरित्या साजरा केला जातो. यंदाचा जत्रोत्सव मार्गशीर्ष शुक्ल पक्ष द्वादशी या दिवशी साजरा होत आहे. त्या निमित्ताने देवस्थानची माहिती पाहूया . . .

मुळदे येथील ॐ श्री नवनाथ श्रद्धास्थान येथे दत्तजयंती उत्सव

तालुक्यातील मुळदे येथील ॐ श्री नवनाथ श्रद्धास्थान, नवनाथ उपासक, प.पू. श्री बाळकृष्ण महादेव घडशी महाराज यांच्या तपोभूमीत दत्तजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त २२ ते २८ डिसेंबर या कालावधीत प्रतिदिन ‘गुरुचरित्रा’चे पारायण होत आहे.