झुवारी पुलाच्या जवळ असलेले गाव कुठ्ठाळी येथे श्री गुरुदेव दत्ताचे मंदिर आहे. या मंदिरात २९ डिसेंबर या दिवशी सायं. ५.३० वाजता श्री दत्तजन्म उत्सव साजरा करण्यात येणार आहे, तर ३० डिसेंबर या दिवशी दुपारी १२ वाजता श्री सत्यदत्त व्रत पूजा असणार आहे. यानिमित्त या देवस्थानविषयीची माहिती थोडक्यात जाणून घेऊया.
मंदिर असलेल्या जागेला विशेष महत्त्व असून तेथे प्रारंभी सर्व हिंदु आणि ख्रिस्ती लोक एकत्र येऊन जागोर आणि इतर धार्मिक कार्यक्रम करत असत. तेथे वडाचे एक झाड आहे आणि सर्व भाविकांना पूजा अन् इतर धार्मिक कार्य केल्यावर त्या ठिकाणी चांगल्या अनुभूती येतात. वर्ष १९६९ मध्ये ग्रामस्थांनी ती जागा विकत घेतली आणि कुठ्ठाळी ग्रामस्थ सेवासंघ या नावाने नोंदणीकृत केली. वर्ष २००२ पासून येथे दत्तजयंती उत्सव चालू झाला आणि गेली १७ वर्षे हा उत्सव चालू आहे.
पंचायतन देवस्थानची स्थापना !
येथे पंचायतन देवस्थान स्थापन करून तेथे श्री गणपति, श्री हनुमान आणि श्री दुर्गादेवी या देवतांची स्थापना करण्यात आली आहे. ही स्थापना वर्ष २००२ मध्ये करवीर पिठाचे शंकराचार्य, काशी पिठाधीश्वर आणि गोव्यातील ब्रह्मीभूत परम पूज्य ब्रह्मानंद स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले होते.
संकलक : श्री. प्रमोद तुयेंकर, पाळे-शिरदोन
सर्वांची आध्यात्मिक उन्नती होवो, अशी श्री दत्तगुरुंच्या चरणी प्रार्थना !