स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊस दरासाठी ‘रस्ता बंद आंदोलन’ : प्रवाशांचे हाल !

प्रतिटनासाठी ३ सहस्र ५०० रुपयांच्या मागणीसाठी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २३ नोव्हेंबरला सकाळी १० वाजल्यापासून पुणे-बेंगळुरू महामार्गावर ‘रस्ता बंद आंदोलन’ चालू केले.

कोल्‍हापूर येथे स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिकठिकाणी ‘रस्‍ता बंद’ आंदोलन !

या वर्षी उसाला पहिला हप्‍ता ३ सहस्र ५०० रुपये देण्‍यात यावा, या मागणीसाठी स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेने १९ नोव्‍हेंबरला ठिकठिकाणी ‘रस्‍ता बंद’ आंदोलन केले.

नाशिक येथे संतप्त शेतकर्‍यांनी अजित पवारांचा ताफा अडवला !

शेतकर्‍यांमध्ये असलेला सरकारी धोरणांच्या विरोधातील प्रचंड रोष दूर होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

कावेरी नदीच्या वादावरून शेतकर्‍यांकडून बेंगळुरू बंदचे आंदोलन

कावेरी नदीच्या वादावरून शेतकर्‍यांनी २६ सप्टेंबर या दिवशी बंद पाळला. कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने १३ सप्टेंबर या दिवशी तमिळनाडूला कावेरी नदीतून १५ दिवसांसाठी ५ सहस्र क्युसेक पाणी सोडण्याचा आदेश दिला होता.

पवना बंदिस्‍त जलवाहिनी प्रकल्‍प कायमस्‍वरूपी हद्दपार करा ! – ठाकरे गटाची मागणी

पवना बंदिस्‍त जलवाहिनी प्रकल्‍प शेतकर्‍यांना देशोधडीला लावणारा असल्‍याने तो मावळ तालुक्‍यातून कायमस्‍वरूपी हद्दपार करावा, अशी मागणी नुकतीच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केली आहे.

पावसाळ्यानंतर ‘हत्ती हटवा’ मोहीम राबवणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

दोडामार्ग तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात हत्ती आणि अन्य वन्य प्राण्यांकडून शेती आणि बागायती यांची मोठ्या प्रमाणात हानी केली जात आहे, तसेच इतरत्रही वन्य प्राण्यांकडून हानी करणे चालू आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत शालेय शिक्षणमंत्र्यांनी अशी ग्वाही दिली.

शेतकर्‍यांच्‍या लाभासाठीच कांद्याच्‍या निर्यातीवर शुल्‍क लावण्‍याचा घेतला निर्णय ! – भारती पवार, केंद्रीय राज्‍यमंत्री

कांदा निर्यातीवर ४० टक्‍के शुल्‍क लावल्‍याने शेतकर्‍यांमध्‍ये प्रचंड संताप आहे. केंद्र सरकारच्‍या या निर्णयाला विरोध म्‍हणून शहरातील सर्व बाजार समित्‍यांमधील कांदा लिलाव शेतकर्‍यांनी बंद पाडले आहेत.

सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यातील हत्तींच्या उपद्रवामुळे संतप्त शेतकरी १० ऑगस्टला आंदोलन करणार !

शासनाने यावर उपाययोजना करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीद्वारे त्याचे दृश्य परिणाम अद्याप दिसत नसून हत्तींकडून हानी करणे चालूच आहे. हत्तींचा उपद्रव थांबवू न शकणारे प्रशासन जनतेच्या सहनशीलतेचा अंत पहात आहे का ?

सिंधुदुर्ग : हत्तींची समस्या सोडवण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्याची चेतावणी

ही समस्या अनेक वर्षांची असून ती सोडवण्यात वनविभाग अपयशी ठरला आहे. सातत्याने होणार्‍या हानीमुळे ग्रामस्थ आणि शेतकरी यांचे मनोबलही खचले आहे.

सिंधुदुर्ग : झरेबांबर ग्रामस्थांचे ‘जलसमाधी’ आंदोलन तूर्तास स्थगित !

धरणांचा लाभ मिळण्यासाठी शेतकर्‍यांना आंदोलन करण्यास भाग पाडणारे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे, अन्यथा विविध प्रकल्प हे ठेकेदार अन् अधिकारी यांच्या लाभासाठीच असतात, असेच जनतेला वाटेल !