धर्मांध हे शिक्षक झाले, तरी हिंदुद्वेषीच रहातात !
हाथरस (उत्तरप्रदेश) येथील ‘साईमा मंसूर पब्लिक स्कूल’ या शाळेत हिंदु विद्यार्थ्याने मुसलमान शिक्षक महंमद अदनान याला ‘राम राम’ म्हटल्याने त्याचा छळ करण्यात आला.
हाथरस (उत्तरप्रदेश) येथील ‘साईमा मंसूर पब्लिक स्कूल’ या शाळेत हिंदु विद्यार्थ्याने मुसलमान शिक्षक महंमद अदनान याला ‘राम राम’ म्हटल्याने त्याचा छळ करण्यात आला.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील पडघा या गावाला इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी ‘अल् शाम’ असे नाव दिले आहे. आतंकवादी साकिब नाचन हा तेथील ‘खलिफा’ (प्रेषिताचा वारस) होता. त्याच्यासह १५ आतंकवाद्यांना येथून अटक करण्यात आली आहे.
एम्.आय.एम्.चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांची तेलंगाणाच्या विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी आक्षेप घेत ‘ओवैसी यांच्यासमोर शपथ घेणार नाही’, अशी घोषणा केली आहे.
काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आणि उद्योगपती धीरज साहू, तसेच त्यांचे सहकारी यांच्या झारखंड, बंगाल अन् ओडिशा येथील ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी घालून २०० कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
जर एखाद्या मंदिरात गेल्यामुळे आपल्या लोकांची हत्या होत असेल, मुली, बहिणी यांच्यावर बलात्कार होत असतील, तर त्या ठिकाणी जाणे बंद करावे, असे विधान देहलीतील आम आदम पक्षाचे आमदार राजेंद्र पाल गौतम यांनी केले आहे.
‘मी मुसलमानांवर अन्याय होऊ देणार नाही. मी मुसलमानांना देशाच्या संपत्तीचे वाटप करत आहे’, असे विधान राज्याचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हुब्बळ्ळी येथील मुसलमानांच्या संमेलनात केले.
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील होली ट्रिनिटी चर्च स्कूल येथे एका विद्यार्थ्याने पटलावर ‘जय श्रीराम’ असे लिहिल्याने शिक्षिका मनीषा मेसी यांनी त्याच्या चेहर्यावर थिनर (रंगकामासाठी वापरण्यात येणारे द्रव) ओतले. हिंदूंच्या विरोधामुळे शिक्षिकेला कामावरून काढून टाकण्यात आले.
तेलंगाणाच्या दिंडीगुल येथे भारतीय वायूदलाचे प्रशिक्षण देणारे विमान कोसळून झालेल्या अपघातात प्रशिक्षक वैमानिक, तर दुसरा शिकाऊ वैमानिक यांचा मृत्यू झाला. गेल्या ८ महिन्यांतील वायुदलाच्या हा तिसरा विमान अपघात आहे.
सनातन धर्माला केलेल्या विरोधामुळे काँग्रेस पक्ष बुडाला. आम्ही सनातन धर्माला विरोध केल्यामुळे पराभूत झालो, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद कृष्णम् यांनी ३ राज्यांत काँग्रेसच्या झालेल्या पराभवावरून पक्षाला घरचा अहेर दिला.
शेखपुरा (बिहार) येथील एका सरकारी शाळेतील मुख्याध्यापक सत्येंद्र चौधरी यांनी मुसलमान विद्यार्थिनींना बुरखा आणि हिजाब यांऐवजी शाळेचा गणवेश परिधान करून येण्यास सांगितल्याने मोठ्या संख्येने मुसलमानांनी शाळेत घुसून चौधरी यांना ठार मारण्याची धमकी दिली.