काळ्या जादूवर उतारा !

संपादकीय 

‘लव्ह जिहाद’साठी काळ्या जादूचा वापर होतो, हे चर्चचे म्हणणे पुरो(अधो)गामी मान्य करणार का ?

संमोहनाद्वारे एखाद्या व्यक्तीचे मन कह्यात घेऊन त्याच्याकडून हवे ते करून घेता येते, असे म्हटले जाते; मात्र ते सत्य नाही. तसेच तंत्र विद्यांद्वारे एखाद्याच्या मनावर नियंत्रण मिळवून त्याच्याकडून हवे ते करवून घेण्याचे प्रकार घडतात, असेही म्हटले जाते. यावर अनेकांचे दुमत असू शकते. अशा प्रकारांवर बुद्धीप्रामाण्यवादी विश्वास ठेवत नाहीत. सध्याच्या विज्ञानवादी २१ व्या शतकामध्ये असे काही होते, हे सांगणे म्हणजे मागास आणि बुरसटलेले असणे होय. तरीही असे अनेक जण आहेत, यावर संशोधन करून खरे किती आणि खोटे किती याचा अभ्यास करतात. ‘भूत नाही’, असे म्हणणारे जगात बरेच असतील, तर तितक्याच प्रमाणात ‘भूत आहेत आणि आम्ही त्याचा अनुभव घेतला आहे’, असे सांगणारे त्याच्या कितीतरी पटींनी अधिक आहेत. यावरही संशोधन करणारे आहेत. ‘करणी, वशीकरण, काळी जादू आदी प्रकार हिंदु धर्मांत अधिक आहेत’, असे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना वाटत असते; मात्र त्याच वेळी अन्य धर्मियांत विशेषतः मुसलमानांमध्ये असे प्रकार आहेत, याविषयी ते ब्रही काढत नाहीत. अनेक दैनिकांतून बंगाली बाबांची जे बहुतांश मुसलमान असतात, त्यांची विज्ञापने प्रसिद्ध होत असतात. त्यांचा फोलपणा उघड करण्याचा प्रयत्न काही संघटना करतात; मात्र ज्याप्रमाणे हिंदूंच्या खर्‍या संतांना विरोध केला जातो, तितक्या प्रमाणात यांना विरोध केला जात नाही. ‘ख्रिस्ती धर्मामध्ये मात्र असे काही होत नाही’, असे म्हटले जाते.

आता केरळमधील चर्चच्या विभागाने ख्रिस्ती तरुणींना लव्ह जिहादच्या जाळ्यामध्ये अडकवण्यासाठी धर्मांधांकडून काळ्या जादूचा प्रयोग केला जात आहे, असा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपाला धर्मांधांनी विरोध केला असला, तरी पुरो(अधो)गाम्यांनी दुजोरा दिलेला नाही. कदाचित् त्यांच्यामते ‘असे काही नाही’, असे असल्याने ते चर्च विभागाचा दावा स्वीकारत नसतील’, असे वाटते. एकवेळ हिंदूंनी असा आरोप केला असता, तर त्याला विरोध झाला असता, हे मान्य करता आले असते; कारण हिंदूंना विरोध करणे हाच पुरोगाम्यांचा एककलमी कार्यक्रम असतो; मात्र चर्चला विरोध करून धर्मांधांची बाजू घेण्याचा प्रयत्न पुरोगाम्यांच्या मौनातून दिसून येत आहे. आता ख्रिस्त्यांनाही हे लक्षात येईल की, पुरोगामी किती पुरोगामी आहेत आणि किती धर्मांधप्रेमी आहेत. लव्ह जिहादमध्ये फसलेल्या तरुणींवर काळी जादू केली जाते, त्यांचे वशीकरण केले जाते, हे त्याला विरोध करणार्‍या हिंदूंच्या संघटनांना नवे नाही. अनेक हिंदू संघटनांनी हे उघड केलेले आहे; मात्र त्याकडे कुणी लक्ष देत नाही; कारण सांगणार्‍या हिंदु संघटना आहेत. आता चर्चच्या विभागाने सांगितल्यावर याकडेतरी गांभीर्याने पाहिले जाईल आणि लव्ह जिहाद रोखण्यासाठी काहीतरी प्रयत्न केला जाईल, अशी अपेक्षा आहे. लव्ह जिहादचे सर्वाधिक प्रमाण केरळमध्येच आहे आणि त्यात ख्रिस्ती तरुणींना फसवल्याची संख्याही मोठी आहे. त्यामुळे यावर चर्चा होऊन या काळ्या जादूवर मात कशी करायची यावर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. हिंदूंच्या काही धार्मिक संस्था यांनी याविषयी प्रयत्न केले आहेत आणि त्यांना यशही आले आहे. या जाळ्यातून बाहेर पडलेल्या तरुणींनी त्यांचे कशा प्रकारे वशीकरण करण्यात आले, ते सांगितल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे चर्च विभागाने काळ्या जादूचा विषय ऐरणीवर आणलाच आहे, तर त्यावर मात करण्यासाठी हिंदूंच्या धार्मिक संस्थांचे साहाय्य घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी त्यांनी धार्मिक भेदभावाकडे दुर्लक्ष करून ख्रिस्ती तरुणींचे जीवन वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. केरळमधील लव्ह जिहादच्या घटना गेल्या अनेक वर्षांपासून होत आहेत. येथे सत्तेवर असलेल्या माकपकडून पीडित हिंदूंना या संदर्भात साहाय्य करण्यात आले नाही, हे समजू शकतो; कारण त्यांच्यात मुळातच हिंदुद्वेष ठासून भरलेला आहे; मात्र आता ख्रिस्तीही लव्ह जिहाद विषयी बोलत आहेत, त्यावरही माकपचे मौन आहे, हे ख्रिस्त्यांनी लक्षात घ्यायला हवे. या तुलनेत हिंदूंच्या संघटना किंवा अन्य राज्यांतील भाजपची सरकारे लव्ह जिहादवर नियंत्रण मिळवण्यासाठी कायदे करत आहेत. एरव्ही भाजपवर टीका करणार्‍या ख्रिस्ती धर्मगुरूंनी याविषयी पुढे येऊन कौतुक केले पाहिजे.

माकपला किंचित आलेली जाग !

माकपमधील हिंदुद्वेष न्यून झालेला नसला, तरी त्याला धर्मांधांच्या वाढत्या कारवायांविषयी थोडीशी जाग आल्याचे दिसून येत आहे. माकपने त्याच्या कार्यकर्त्यांसाठी पक्षांतर्गत पत्रक काढले आहे आणि त्यात धर्मांधांच्या धर्मांधतेविषयी जागरूक रहाण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांचा यात उल्लेख केला आहे. त्याच वेळी मुसलमान अप्रसन्न होणार नाहीत, यासाठी आणि समतोल साधण्यासाठी माकपने खिस्त्यांमध्येही धर्मांधता वाढत असल्याचा दावा करत त्यांच्याकडे लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. आता ख्रिस्त्यांना हे कितपत मान्य होणार हा भाग वेगळा असला, तरी हिंदूंना हे मान्य आहे की, ख्रिस्ती माओवादी मोठ्या संख्येने नक्षलवादी कारवाया करतात. त्यांनीच स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांच्या ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या आदेशाने हत्या केल्याचे म्हटले जाते. त्यामुळे हिंदूंच्या संघटना हे नाकारणार नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. तरीही माकपने लव्ह जिहादविषयी सतर्क रहाण्यास सांगितले आहे, तर आता ‘माकपचे कार्यकर्ते हिंदूंच्या संघटनांच्या खांद्याला खांदा लावून लव्ह जिहाद रोखण्यासाठी प्रयत्न करतील का ?’ हा प्रश्न आहे, तसेच केरळमध्ये माकपचे सरकार असल्याने सरकारी स्तरावरून लव्ह जिहाद करणार्‍या धर्मांधांवर कारवाई होणार का ?’, हाही प्रश्न आहे. लव्ह जिहादच्या विरोधात पोलीस ठाण्यांत तक्रार केली, तर पोलीस नेहमीच धर्मांधांची बाजू घेतात, असाच अनुभव हिंदूंना आणि त्यांच्या संघटनांना येत असतो, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे माकप सरकारकडून काही प्रयत्न केला जाईल, याची वाट पहावी लागेल. देशातील एकूणच लव्ह जिहादचा नायनाट करण्यासाठी केंद्र सरकारनेच कायदा करण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारवर हिंदूंना आणि त्यांच्या संघटनांनी दबाव आणून काहीही होत नसल्याने आता ख्रिस्त्यांनी आणि त्यांच्या चर्चने हा प्रयत्न करून पहावा, असे वाटते !