वेदरक्षणाच्या परंपरेच्या विस्ताराची आवश्यकता ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
येणारा काळ हा भारत आणि सनातन धर्म यांचा आहे. वेद म्हणजे ज्ञानाचे भंडार आहे. वेदांमध्ये सर्व काही आहे. सातत्याने होणार्या आक्रमणांमुळे सर्वत्र, विशेषतः उत्तर भारतात वेदिक ज्ञानाची मोठी हानी झाली. अग्निहोत्राच्या अनुयायांनी युगानुयुगे या ज्ञानाचे रक्षण केले आहे.