मुसलमान महिलेची मलेशियातील उच्च न्यायालयात याचिका
कुआलालंपूर (मलेशिया) – येथे एका मुसलमान महिलेने येथील उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. या याचिकेवर १५ जून या दिवशी सुनावणी होणार आहे. या याचिकेत या महिलेने म्हटले आहे की, तिला इस्लाम धर्म अजिबात आवडत नाही आणि ती त्याच्या कोणत्याही नियमाला मानत नाही. मी डुकराचे मांस खाते आणि मद्य प्राशन करते.
१. या महिलेने पुढे म्हटले आहे की, मला माझ्या मुसलमान आई-वडिलांनी जन्म दिला असला, तरी मी कधी इस्लामला स्वीकारले नाही. न्यायालयाने ‘मी मुसलमान नाही’, असे घोषित करावे. तसेच न्यायालयाने ‘शरिया न्यायालयाला एखाद्या व्यक्तीला इस्लाममधून बाहेर काढण्याचा अधिकार आहे कि नाही ?’, हेही ठरवावे, अशी मागणी केली आहे.
२. वर्ष २०२० मध्ये या महिलेने शरिया उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून तिला इस्लाम सोडण्याची मान्यता द्यावी, अशी मागणी केली होती. ही मागणी या न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर या महिलेने उच्च न्यायालयात वरील मागणी केली.