राज्यातील १४१ अल्पसंख्यांकबहुल शाळा-महाविद्यालयेे यांना राज्य सरकारकडून २ कोटी ८२ लाख रुपयांचे अनुदान !
मुंबई, २९ जुलै (वार्ता.) – राज्यातील १४१ शाळा आणि महाविद्यालये यांना महाराष्ट्र सरकारने २ कोटी ८२ लाख रुपये इतके अनुदान घोषित केले आहे. विशेष म्हणजे धर्मनिरपेक्ष देशात धार्मिक आधारावर हे अनुदान देण्यात येत आहे. राज्य सरकारच्या आदेशात तसा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता असतांना वर्ष २००९ ही योजना महाराष्ट्रात चालू करण्यात आली. युती सरकारच्या काळातही ही योजना चालू ठेवण्यात आली होती. धार्मिक अल्पसंख्यांकबहुल विद्यार्थी असलेल्या शासनमान्य शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदींना हे अनुदान दिले जाते. सातारा, वाशिम, यवतमाळ, संभाजीनगर, जालना, नागपूर आणि बीड येथील १४१ शाळांना प्रत्येकी २ लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेच्या अंतर्गत उद्भवणार्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय निवड समिती नियुक्त करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाधर्मनिरपेक्ष देशात धर्माच्या आधारावर मदरशांना अनुदान कशासाठी ? |