अवैध व्‍यवसायांमध्‍ये कुणालाही पाठीशी घालणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

ज्‍या खेळांमुळे तरुण पिढी वाईट मार्गाला जाऊ शकते अशा खेळांची अथवा गुटख्‍यासारख्‍या पदार्थांचे विज्ञापन करावे का ? याविषयी प्रसिद्ध व्‍यक्‍तिमत्त्वांनी विचार करावा, असे आवाहन उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केले.

जाणीवपूर्वक धार्मिक भावना दुखावण्‍याचे प्रकार खपवून घेणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

हिंदूंच्‍या मंदिरांमधील धर्मांधांचा हैदोस खपवून घेतला जाणार नाही, असा वचक पोलीस कधी निर्माण करणार ?

देवेंद्र फडणवीस यांच्‍या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईत ‘सेवा दिवस’ साजरा !

उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष संदीप नाईक यांच्‍या मार्गदर्शनाखाली आणि त्‍यांच्‍या प्रमुख उपस्‍थितीमध्‍ये नवी मुंबई भाजपच्‍या वतीने सर्वत्र सेवा दिवस साजरा करण्‍यात आला.

दुर्गम भागामुळे बचाव पथकाचे काम अधिक वेळ चालेल ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुर्घटनेत २५ ते २८ जण बाधित झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ७० नागरिक सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. २१ जण घायाळ असून त्यांतील १७ जणांवर स्थानिक ठिकाणी उपचार चालू आहेत, तर ६ जणांना पनवेल येथील महात्मा गांधी रुग्णालयात उपचार चालू आहे. आतापर्यंत १० लोकांचे मृतदेह प्राप्त झाले आहेत.

राज्‍यातून बेपत्ता होणार्‍या मुलींविषयी विधीमंडळात चर्चा करणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी महाराष्‍ट्रातून दिवसाला सरासरी ७० युवती बेपत्ता होतात तसेच पुणे येथून २ सहस्र ८५८ मुली बेपत्ता असल्‍याची माहिती सभागृहात दिली.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी द्वेषात्मक भाषणांवर निर्बंध ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या जातीय तेढ, विद्वेषात्मक वातावरण निर्माण करणार्‍या भाषणांवर निर्बंध आहेत.

दंगलखोर धर्मांधाची तळी उचलून अबू आझमी यांचा हिंदूंना दंगलखोर ठरवण्याचा प्रयत्न !

लक्षवेधीवर बोलतांना हिंदूंकडून ‘इस देश मे रहना होगा, तो वन्दे मातरम् कहना होगा’, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले. या घोषणांमुळे दंगल झाल्याचा कांगावाही या वेळी अबू आझमी यांनी केला.

ग्राहकांनी वीजदेयकात मिळणार्‍या सवलतींचा लाभ घ्यावा !

देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि ग्राहकाभिमूख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार अधिकाधिक ग्राहकांना वीजदेयकांतील सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे.

स्‍थगन प्रस्‍तावावरील चर्चेस अध्‍यक्षांच्‍या नकारामुळे विरोधकांचा सभात्‍याग !

‘राज्‍यातील शेतकर्‍यांच्‍या प्रश्‍नावर चर्चा करण्‍यात यावी’, अशी त्‍यांनी मागणी केली; मात्र विधानसभा अध्‍यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा प्रस्‍ताव फेटाळला.

अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यास नकार दिल्याने विरोधकांचा सभात्याग !

डॉ. नीलम गोर्‍हेंविरोधात प्रस्ताव मांडायचा असेल, तर त्याची प्रक्रिया असते. कायद्यातील तरतुदीनुसार असा प्रस्ताव मांडता येईल; मात्र त्यासाठी सभागृहाला वेठीस धरता येणार नाही-देवेंद्र फडणवीस