वर्ष २००६ मध्ये सचिन तेंडुलकर यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता !

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याची स्वीकृती !

नवी देहली – भारताचा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना मी ठार मारण्याचा प्रयत्न केला होता, अशी स्वीकृती देणारा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याचा एका व्हिडिओ प्रसारित झाला आहे. जून २०२२ मध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने हे विधान केले होते. वर्ष २००६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात नॅशनल स्टेडियमवर झालेल्या तिसर्‍या कसोटी सामन्याविषयी तो बोलत होता.

अख्तर पुढे म्हणाला की, मी आज हे स्पष्टपणे सांगत आहे की, एका सामन्यात मला खरोखरच सचिनला दुखापत करायची होती. मी तोच प्रयत्न करत होतो. कोणत्याही परिस्थितीत त्याला दुखपत करण्याचा माझा निश्‍चय होत. कर्णधार इंझमाम-उल्-हकने तेव्हा मला यष्टींच्या समोर गोलंदाजी करण्यास सांगितले होते, तरीही मी माझा प्रयत्न चालूच ठेवला. मी जाणूनबुजून सचिनच्या शिरस्त्राणावर चेंडू मारले. जेव्हा त्याला चेंडू लागला, तेव्हा तर तो (सचिन) मेलाच असेल, असे मला वाटले; पण नंतर कळले की, चेंडू त्याच्या कपाळावर आदळला. मग मी त्याला दुखापत करण्याचा पुन्हा प्रयत्न केला.

 (सौजन्य : Republic Bharat)

महेंद्रसिंह धोनी यांनाही घायाळ करण्याचा केला होता प्रयत्न !

वर्ष ऑक्टोबर २०२१ मध्ये एका चर्चासत्रात बोलतांना शोएब अख्तर याने मान्य केले की, वर्ष २००६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फैजलाबाद कसोटी सामन्यात गोलंदाजी करतांना भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी याला जाणूनबुजून शरीरवेधी चेंडू टाकला होता.

धोनी एक चांगला माणूस आहे आणि मी त्याचा आदर करतो. मला त्याचे फार वाईट वाटले. जर धोनीला चेंडू लागला असता, तर त्याला गंभीर दुखापत झाली असती.

संपादकीय भूमिका

  • क्रिक्रेट जिहाद करणार्‍या पाकिस्तानशी क्रिकेट खेळायचे नाही, असा निर्णय भारत कधी घेणार ?
  • भारताने पाकशी खेळण्याला विरोध करणार्‍या राष्ट्रप्रेमींवर टीका करणारे आता गप्प का ?