देशातील ७६७ लाख हेक्टर वनभूमी पैकी १३.३५ लाख हेक्टर भूमी भूमाफियांच्या कह्यात !

यास उत्तरदायी असलेल्या जनताद्रोही अधिकार्‍यांची सरकारने सर्व संपत्ती जप्त करून त्यांच्याकडून ही हानी वसूल करावी आणि त्यांना आजन्म कारागृहात टाकावे ! यासह सरकारी भूमी गिळंकृत करणार्‍या भूमाफियांनाही सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त ! – राष्ट्रीय कुस्ती संघटनेचा निर्णय

गेल्या काही दिवसांत कुस्तीगीर संघाच्या कामाविषयी अनेक तक्रारी येत होत्या. संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांना मी त्यात सुधारणा करण्यास सांगितले होते’, असे शरद पवार यांनी सांगितले.

देशातील ११ राज्यांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची चेतावणी

हवामान विभागाने महाराष्ट्र, मध्यप्रदेश, देहली, पंजाब, हरियाणा यांसह देशातील ११ राज्यांत मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची चेतावणी दिली आहे.

देहली येथे ‘स्पाइसजेट’ विमानाचे ‘इमरजन्सी लँडिंग’ !

देहली विमानतळावरून सकाळी ‘स्पाइसजेट’च्या विमानाने उड्डाण केले. काही मिनिटांतच विमानात धूर पसरला. धुराचे लोट निघाल्यानंतर त्याचे ‘इमरजन्सी लँडिंग’ करण्यात आले

भारतीय न्यायव्यवस्थेसाठी काळा दिवस ! – आनंद रंगनाथन्

आजचा दिवस हा भारतीय न्यायव्यवस्थेसाठी काळा दिवस आहे. या देशात आता न्यायाची आशा नाही. कसलीही आशा शिल्लक राहिलेली नाही. नूपुर शर्मा यांची येणार्‍या काळात रक्ताला तहानलेल्या जिहाद्यांकडून हत्या होऊ शकते.

व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट !

राजधानीत देहलीमध्ये आधी याची किंमत २ सहस्र २१९ रुपये होती, ती आता २ सहस्र २१ रुपये झाली आहे.

भारताच्या ‘सिंगल यूज प्लास्टिक’वरील बंदीचे जगभरातून स्वागत !

भारतातील डेन्मार्कचे राजदूत फ्रेडी स्वेन म्हणाले की, मला वाटते ही फार मोठी कल्पना आहे. भारताने या प्लास्टिकवर घातलेली बंदी ही पृथ्वीला मिळालेली मोठी देणगी आहे. भारत या दिशेने मोठे योगदान देत आहे; म्हणूनच मी भारताचे अभिनंदन करतो.

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धात चर्चेच्या माध्यमातून उपाय काढण्याचा पंतप्रधान मोदी यांचा पुनरुच्चार

रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात चर्चा आणि कूटनीती यांच्या माध्यमातून उपाय काढण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

(म्हणे) ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दायित्व पार पाडण्यात भारतीय अधिकारी अपयशी !’

काश्मीरमध्ये फोफावलेल्या जिहादी आतंकवादाचे समर्थन करणार्‍या ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ या बंदी घातलेल्या भारतद्वेषी संघटनेला हिंदूंचा कथित पुळका

सोनिया गांधी यांच्या स्वीय साहाय्यकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंद

माधवन् यांनी विवाह आणि नोकरी देण्याचे आमीष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप या महिलेकडून करण्यात आला आहे. माधवन् यांच्याकडून ठार मारण्याची धमकी येत असल्याने तिने संरक्षण देण्याचीही मागणी केली आहे.