|
नवी देहली – लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सातवा टप्पा म्हणजे शेवटचा टप्पा १ जून या दिवशी सायंकाळी ६ वाजता संपला. यानंतर वृत्तवाहिन्या, तसेच काही संस्था यांनी मतदानोत्तर चाचणीतून वर्तवलेला अंदाज प्रसारित करण्यात आला. यात भाजपप्रणीत आघाडीला ३५३ ते ३६९ इतक्या जागांवर विजय मिळत असल्याचे सांगण्यात आले, तर त्याच वेळी काँग्रेस आणि तिच्या मित्र पक्षांच्या ‘इंडी आघाडी’ला ११८ ते १३३ जागा मिळत असल्याचा वर्तवण्यात आला आहे. यातून नरेंद्र मोदी तिसर्यांदा पंतप्रधानपदी बसणार आहेत, हे स्पष्ट होत आहे.
महाविकास आघाडीला २३ ते २५, तर महायुतीला २२ ते २६ जागा मिळतील !‘एबीपी माझा सी व्होटर सर्वे’चा महाराष्ट्राचा राजकीय निकाल !मुंबई – महाराष्ट्रातील ‘एबीपी माझा सी व्होटर सर्वे’नुसार महाविकास आघाडीला महाराष्ट्रात २३ ते २५ जागा मिळतील, तर महायुतीला २२ ते २६ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वर्ष २०१९ च्या निवडणुकीत एन्डीएने ४१ जगांवर विजय मिळवला होता. त्यातुलनेत यंदा जवळपास १५ जागा अल्प मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. |