धर्मग्रंथ, संस्कृती आणि संस्कार यांविषयी मुलांना सुलभ माहिती उपलब्ध !

मडगाव (गोवा) – सनातन धर्म आणि हिंदु संस्कृती यांची ओळख मुलांना सोप्या पद्धतीने करून देण्यासाठी ‘गेट वे टू सनातन धर्म : ग्लिम्पसेस ऑफ हिंदु कल्चर’ (सनातन धर्माचे प्रवेशद्वार: हिंदु संस्कृतीची एक झलक) हे इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे.
📚 A Gateway to Sanatan Dharma for Young Minds! 🚩
The English-language book "Gateway to Sanatan Dharma", compiled by Meena Thakker, has been published!
Written in simple language, it introduces children to the essence of Sanatan Dharma, Hindu culture, scriptures, and timeless… pic.twitter.com/rtN56R3vey
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 28, 2026

व्हिडिओतील माहितीनुसार, मीना ठक्कर यांनी संकलित केलेल्या या पुस्तकात विविध वेद, उपनिषदे, स्मृति, भगवद्गीता, रामायण, महाभारत आदी हिंदु धर्मग्रंथ, इतिहास, संस्कार, सण-उत्सव आणि भारतीय परंपरा यांची प्राथमिक माहिती सोप्या भाषेत देण्यात आली आहे. बदलत्या काळात मुलांना माहिती सहज उपलब्ध होत असली, तरी योग्य मार्गदर्शनाचा अभाव जाणवत असल्याने हे पुस्तक सिद्ध करण्यात आल्याचे या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. मुलांमध्ये गोंधळ न होता त्यांच्या मनात जिज्ञासा निर्माण व्हावी, यावर पुस्तकात विशेष भर देण्यात आला आहे.
View this post on Instagram
चित्र रंगवण्याचीही व्यवस्था !
पुस्तकात वरील माहितीसह मुलांसाठी चित्र रंगवणे आणि इतर शैक्षणिक उपक्रम, यांचाही समावेश करण्यात आला आहे. पुढील पिढीला भारतीय संस्कृतीशी जोडण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल, असा विश्वासही या पुस्तकाच्या संदर्भात व्यक्त करण्यात आला आहे.
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !