१५ मेपासून होता पसार

सावंतवाडी – महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्या बंदी असतांनाही गोमांसाची अवैधरित्या वाहतूक करणारा आणि गेल्या काही दिवसांपासून पसार असलेला संशयित आरोपी सरफराज भाऊद्दीन ख्वाजा (रहाणार बाहेरचा वाडा, सावंतवाडी) याला पोलिसांनी २६ जून या दिवशी सापळा रचून अटक केली. सरफराज बाहेरचा वाडा येथे आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडी आणि वेंगुर्ला पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे कारवाई करून त्याला अटक केली.
१५ मे या दिवशी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी सरफराज सावंतवाडी येथून आजगाव येथे दुचाकीवरून २५ किलो वजनाचे गोमांस विक्रीसाठी घेऊन जात होता. धाकोरे येथे आल्यावर तेथील ग्रामस्थांना सरफराजविषयी संशय आल्याने त्याचा पाठलाग केला. ग्रामस्थ पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्यावर सरफराज याने २५ किलो गोमांस तेथील एका काजूच्या बागेत फेकून दिले आणि दुचाकीसह तो पसार झाला. याविषयी पोलिसांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली आणि सरफराजच्या विरोधात विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंद केला होता.
गावाचे शहरीकरण करण्याविषयी मत मागवणारे परिपत्रक गोवा सरकारने मागे घेतले !
हणजूण पंचायत क्षेत्राला ‘व्यावसायिक क्षेत्र’ घोषित करण्याची गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची शिफारस
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
Dhubri Beef Arrest : धुबरी (आसाम) : गोमांस बाळगणार्या ५ जणांना अटक : गोमांस जप्त
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
रत्नागिरीत पुन्हा सापडले गोमांस : पोलिसांनी धाड टाकून केली एकाला अटक