
पुणे – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात शांतता आणि सुव्यवस्था रहावी म्हणून पोलीस सहआयुक्त सारंग आवाड यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) आणि (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश २४ जून ते ७ जुलै पर्यंत लागू केले आहेत. कोणताही दाहक, स्फोटक पदार्थ, शस्त्रे, अस्त्रे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका, शारीरिक इजा करण्यासाठी वापरण्यात येणार्या वस्तू, कोणत्याही इसमाच्या प्रेताचे किंवा प्रतिमेचे प्रदर्शन आणि दहन, मोठ्याने किंवा अयोग्य शब्दात घोषणा देणे, वाद्य वाजवणे, प्रक्षोभक भाषणे किंवा प्रक्षोभक अविर्भाव, तसेच ज्यामुळे कायदा अन् सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन करणे, ५ पेक्षा अधिक लोकांचा जमाव करणे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांच्या पूर्वसंमतीविना सभा घेणे, मिरवणुका काढणे यास बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम वर्ष १९५१ च्या कलम १३५ प्रमाणे शिक्षा होईल, असे आदेशात नमूद केले आहे.
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
आज पुणे येथे डॉ. नीलेश ओक यांचे ‘डायनॅमिक भारत २०४७’ विषयावर व्याख्यान !
देहू (पुणे) ते पंढरपूर ‘सायकल वारी’ची दशकपूर्ती !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
Chhattisgarh Tribal Christians : नारायणपूर (छत्तीसगड) येथील गावात ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना गावकर्यांनी गावाबाहेर काढले !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज