
फोंडा, २७ जून – मंदिर विश्वस्तांनी ‘सर्मधर्मसमभावा’च्या गोंडस नावाखाली मंदिर परिसराचे पावित्र्य नष्ट करू नये, असे आवाहन ‘गोमंतक मंदिर महासंघा’ने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
शिरोडा, फोंडा येथील श्री कामाक्षी मंदिराच्या पवित्र तळीमध्ये ख्रिस्ती बांधवांनी ‘सांजाव’ साजरा केला. मंदिराच्या प्रथेनुसार हा ‘सांजाव’ साजरा केल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘गोमंतक मंदिर महासंघा’चे सचिव श्री. जयेश थळी म्हणाले, ‘‘मंदिराचे तळे हे तीर्थरूपी असते आणि हे तळे केवळ मंदिराच्या उत्सवाच्या वेळी वापरले जाते. दारू पिऊन तळ्यात ‘सांजाव’ साजरा केल्याने तळे अपवित्र झाले आहे. ही एक संतापजनक आणि दुर्दैवी गोष्ट आहे. पोर्तुगीज राजवटीत आपल्या पूर्वजांनी प्राण पणाला लावून आपल्या मंदिरांचे पावित्र्य राखले; मात्र आज धार्मिक सलोख्याच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धा पायदळी तुडवल्या जात आहेत. इतर धर्मियांच्या पवित्र स्थळी असा स्वैराचार करण्याची अनुमती कुणी देणार का ? या गंभीर चुकीबद्दल दोषींनी तात्काळ क्षमा मागावी आणि मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी कडक पावले उचलावीत.’’
मराठी पाठ्यपुस्तकांच्या संदर्भातील प्रादेशिक अस्मितेचे सूत्र निरर्थक ! – प्रा. सुभाष वेलिंगकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचे लोकार्पण
गोमांसाची अवैधरित्या वाहतूक करणारा सरफराज ख्वाजा याला अटक
गावाचे शहरीकरण करण्याविषयी मत मागवणारे परिपत्रक गोवा सरकारने मागे घेतले !
हणजूण पंचायत क्षेत्राला ‘व्यावसायिक क्षेत्र’ घोषित करण्याची गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची शिफारस
भिवंडी येथे गॅसच्या गोदामावर धाड !