
पुणे – भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास आणि त्यातून भविष्यातील भारताची दिशा यांविषयी मार्गदर्शन करणारे ‘डायनॅमिक भारत २०४७’ हे विशेष व्याख्यान २८ जूनला सायंकाळी ५ वाजता कर्वेनगर येथील पंडित फार्म्स, डी.पी. रोड येथे आयोजित करण्यात आले आहे. नागरिक सोशल फाउंडेशन आणि ॲम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात प्राचीन इतिहासाचे अभ्यासक आणि संशोधक डॉ. नीलेश ओक मार्गदर्शन करणार आहेत. रामायण आणि महाभारत ही केवळ महाकाव्ये किंवा काल्पनिक कथा नसून ती भारतीय इतिहासाच्या प्रदीर्घ परंपरेचा भाग असल्याचा दृष्टीकोन मांडत, इतिहासाचे चिंतन वर्तमान आणि भविष्य घडवण्यासाठी कसे उपयुक्त ठरू शकते, यावर ते भाष्य करणार आहेत.
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी करण्यात आले आहे.
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) आणि (३) लागू !
देहू (पुणे) ते पंढरपूर ‘सायकल वारी’ची दशकपूर्ती !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात