» एका दिवसात २३५ किलोमीटर अंतर पूर्ण » २ सहस्रांहून अधिक सायकलस्वारांचा सहभाग

पुणे – १० वर्षांपूर्वी पर्यावरण संवर्धन आणि आरोग्य यांचा संदेश देणार्या केवळ ७ सायकलस्वारांपासून चालू झालेल्या ‘सायकल वारी’ या उपक्रमामध्ये यंदा २ सहस्रांहून अधिक सायकलस्वार सहभागी झाले होते. ‘पुणे ते पंढरपूर सायकल वारी’ ही देहू येथील गाथा मंदिरापासून प्रारंभ झाली. सायकलपटूंनी देहू ते पंढरपूर हे २३५ किलोमीटरचे अंतर एका दिवसामध्ये पूर्ण केले. यात पुणे, मुंबई, बेंगळुरू आणि भाग्यनगर येथील सायकलपटू सहभागी झाले होते.
अनुमाने ३० सहस्र सायकलस्वार, गिर्यारोहक आणि क्रीडाप्रेमी यांचा समावेश असलेल्या ‘इंडो ॲथलेटिक सोसायटी’चे संस्थापक अध्यक्ष अधिवक्ता गजानन खैरे म्हणाले, ‘‘व्यावसायिक दायित्वांमुळे अधिक दिवस सुट्टी मिळत नाही. त्यामुळे आम्ही पायी वारीमध्ये सहभागी होऊ शकलो नाही. आमचे वारीशी तितकेच आध्यात्मिक नाते असल्याने आम्ही ‘सायकल वारी’ करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या वर्षी २०१६ मध्ये ७ जण होतो. प्रतीवर्षी संख्या वाढत गेली.’’
‘यंदाच्या वारीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कुटुंबे सहभागी झाली. अनेकांनी हा प्रवास पूर्ण केला. काहींनी ठराविक अंतरापर्यंत सायकल चालवली. या वारीमध्ये ३०० हून अधिक महिलांसह १०० मुलांनी सहभाग घेतला होता. भाग्यनगरचे ८० वर्षांचे गृहस्थ यांचाही सहभाग लाभला’, असे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गिरिराज उमरीकर यांनी सांगितले.
सिडको परिसरातील तलावांमधील प्रदूषणाची चौकशी होणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
ग्रामीण भागांत २० विद्यार्थ्यांमागे ३ शिक्षक अनुज्ञेय ! – डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री
ए.पी.एम्.सी. येथे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जयंती उत्साहात साजरी
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
आज पुणे येथे डॉ. नीलेश ओक यांचे ‘डायनॅमिक भारत २०४७’ विषयावर व्याख्यान !
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) आणि (३) लागू !