सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचे लोकार्पण

‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्या

देवगड – एस्.टी. महामंडळाच्या मालवण, कणकवली आणि देवगड या आगारांना प्रत्येक ५ ‘राजमाता जिजाऊ’ या नव्या बसगाड्या मिळाल्या आहेत. देवगड आणि कणकवली येथे या गाड्यांचे लोकार्पण करतांना पालकमंत्री नितेश राणे यांनी बसगाडीमध्ये जाऊन आसन व्यवस्था, प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधा, तसेच बसगाड्यांची एकूण रचना यांविषयी सविस्तर माहिती घेतली. ‘सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वाहतूक व्यवस्थेला आणखी बळकटी देण्यासाठी लवकरच २० मिनी बस जिल्ह्यात येणार आहेत. त्यामुळे दुर्गम आणि ग्रामीण भागातील ग्रामस्थांचा प्रवास अधिक सुलभ अन् सुखकर होणार आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक चांगली आणि सुरक्षित सेवा मिळावी, यासाठी राज्य परिवहन विभाग प्रयत्नशील आहे’, असे मंत्री राणे यांनी या वेळी सांगितले.