महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी निकष शिथील !

मुंबई, २७ जून (वार्ता.) – ग्रामीण आणि दुर्गम भागांतील इयत्ता ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक कोंडी फुटणार आहे. या भागांतील दोन्ही वर्गांची एकत्रित पटसंख्या २० किंवा त्याहून अधिक असल्यास तेथे ३ शिक्षक अनुज्ञेय करण्याची मोठी सवलत शासनाने दिली आहे, अशी माहिती राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी २५ जून या दिवशी विधान परिषदेत दिली. आमदार किरण सरनाईक आणि इतर सदस्य यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
पूर्वीच्या नियमानुसार एकत्रित पटसंख्या ४० असणे बंधनकारक होते; मात्र ग्रामीण भागातील मुलींना दुसर्या गावी जावे लागू नये, या सामाजिक जाणिवेतून हा निकष शिथिल करण्यात आला आहे, तसेच ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून गुणवत्ताधारक शिक्षकांची पारदर्शक भरती चालू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयाला उच्च न्यायालयानेही वैध ठरवले आहे.
सिडको परिसरातील तलावांमधील प्रदूषणाची चौकशी होणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
ए.पी.एम्.सी. येथे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जयंती उत्साहात साजरी
देहू (पुणे) ते पंढरपूर ‘सायकल वारी’ची दशकपूर्ती !
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू