पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !

       

पुणे – रेल्वेस्थानक परिसरात आणि गाड्यांमध्ये किरकोळ वस्तूंची विक्री करणार्‍या फेरीवाले विक्रेत्यांवर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कारवाई केली. या वेळी २७ अनधिकृत फेरीवाल्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून प्रत्येकी २ सहस्र रुपयांप्रमाणे ५४ सहस्र रुपयांचा आर्थिक दंड वसूल करण्यात आला. अप्रमाणित पिण्याच्या पाण्याची ३५ खोकी म्हणजे ४२० बाटल्या जप्त करण्यात आल्या. (प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणार्‍या विक्रेत्यांना केवळ आर्थिक दंड नव्हे, तर त्यांना कडक शिक्षा करायला हवी ! – संपादक) रेल्वेतील प्रवाशांनी खाद्यपदार्थ आणि पिण्याचे पाणी अधिकृत रेल्वेची दुकाने (स्टॉल) किंवा मान्यताप्राप्त विक्रेत्यांकडूनच खरेदी करावे. स्थानकावर कोणताही अनधिकृत विक्रेता आढळल्यास त्याची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.