हिंदुत्वनिष्ठ संघटनांची आंदोलनाची चेतावणी !
गर्भवती हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक !

छत्रपती संभाजीनगर – येथील हर्सूल परिसरातील २४ वर्षीय गर्भवती हिंदु विवाहित महिलेची असाहाय्यता आणि कौटुंबिक वाद यांचा अपलाभ उठवून शाहिद कय्युम सय्यद (वय २७ वर्षे, रा. शिवाजीनगर) याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्यावर वारंवार अत्याचार केला. या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. हे प्रकरण ‘लव्ह जिहाद’चे असून हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. ‘आरोपी शाहिद सय्यद याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल’, अशी चेतावणी हिंदुत्वनिष्ठांनी दिली आहे. (‘लव्ह जिहाद’ अस्तित्वातच नाही’, असे म्हणणार्या निधर्मीवाद्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही घटना आहे. – संपादक)
१. पतीसमवेत वाद होत असल्याने २ महिन्यांची गर्भवती असलेली हिंदु महिला विभक्त रहात होती. कामाच्या ठिकाणी तिची शाहिद सय्यदशी ओळख झाली. त्याने विवाह करून होणार्या मुलाला स्वतःचे नाव देणार असल्याचे सांगून तिच्यावर अत्याचार केला.
२. जुलै २०२५ मध्ये पीडितेने मुलीला जन्म दिला. त्यानंतर अवघ्या दीड महिन्याने शाहिदने पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने त्याच्याकडे विवाहाचा तगादा लावल्यावर त्याने तिच्याशी संपर्क तोडला. तेव्हा तो विवाहित असल्याचे समोर आले. पीडितेच्या तक्रारीवरून सातारा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
भिवंडी येथे गॅसच्या गोदामावर धाड !
भिवंडी येथे खाऊचे आमीष दाखवून ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार
धर्म आणि संस्कार यांची महती अन् हिंदु पालकांचे दायित्व
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
उत्पन्नवाढीसाठी हॉटेल्सना केले जाणार एस्.टी.चे अधिकृत बसथांबे !
‘एकल अभियाना’च्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रात परिवर्तन !