Tharoor’s Assistant Arrested : सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्या स्वीय साहाय्यकाला अटक

नवी देहली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि थिरुवनंतपूरम् (केरळ) लोकसभा मतदारसंघाचे खासदार शशी थरूर यांचा स्वीय साहाय्यक शिवकुमार याला सोन्याच्या तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागाने २९ मेच्या संध्याकाळी येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-३ वर शिवकुमार याच्यावर कारवाई केली. त्याच्याकडून एकूण ५०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे.


सीमाशुल्क विभागाने शिवकुमारला पकडले, त्या वेळी तो दुबईहून परतला होता आणि परदेशातून परतलेल्या एका ओळखीच्या व्यक्तीकडून सोने हस्तांतरित करत होता. याची किंमत ५५ लाख रुपये होती. अधिकार्‍यांनी या सोन्याविषयी विचारणा केली असता शिवकुमार कोणतीही ठोस माहिती देऊ शकला नाही. यानंतर त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी आणखी २ जणांनाही अटक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

अशा प्रकारची तस्करी त्याने पूर्वीही केली आहे का ?, याचीही चौकशी झाली पाहिजे !