खालच्या न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवली !

बलात्कार हा केवळ पीडितेसाठीच नाही, तर संपूर्ण समाजासाठी निंदनीय आहे. अल्पवयीन मुलांवरील गुन्ह्यांमध्ये विशेषकरून लैंगिक अत्याचारांमध्ये चिंताजनक वाढ होत असतांना न्यायालयांनी सुज्ञ कायदेशीर उपायांचा अवलंब करणे महत्त्वाचे ठरते.

एका अमेरिकी डॉलरसाठी मोजावे लागणार ८३ रुपये !

एका अमेरिकी डॉलरमागे ८३ भारतीय रुपये मोजावे लागणार आहेत. विदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय भांडवली बाजारात केलेल्या समभागांच्या विक्रीमुळे हे अवमूल्यन झाल्याचे सांगण्यात आले.

देहलीमध्ये फटाक्यांची खरेदी-विक्री करणार्‍यावर बंदी

देहली राज्यामध्ये फटाक्यांची निर्मिती, संग्रह आणि विक्री करणार्‍यांना ५ सहस्र रुपयांचा दंड आणि ३ वर्षांपर्यंत कारावास अशी शिक्षा होऊ शकते, अशी माहिती देहलीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी दिली.

मल्लिकाकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष !

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांचा विजय झाला आहे. त्यांना ७ सहस्र ८९७, तर त्यांचे प्रतिस्पर्धी शशी थरूर यांना केवळ १ सहस्र ७२ मते मिळाली. या निवडणुकीत ४०० हून अधिक मते बाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांच्या ज्योतिष पीठाचे शंकराचार्य म्हणून पट्टाभिषेक करण्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंडमधील ज्योतिष पीठाचे नवे शंकराचार्य म्हणून स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांचा पट्टाभिषेक करण्यावर स्थगिती आणली आहे. याविषयी प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवरून हा आदेश देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची तुलना भगतसिंह यांच्याशी केली !

क्रांतीकारकांचा अवमान करणार्‍या केजरीवाल यांनी क्षमा मागण्याचे भगतसिंह यांच्या कुटुंबियांची मागणी

अमेरिका-युरोप येथे वाढली आयोडिन औषधांची मागणी

अणूबाँबमुळे होणार्‍या किरणोत्सर्गापासून रक्षण करण्यासाठी आयोडिन औषध महत्त्वाचे मानले जाते. पोटॅशियम आणि आयोडिन या २ रसायनांचे मिश्रण करून हे औषध सिद्ध केले जाते. त्याला ‘पोटॅशियम आयोडाईड’ असेही म्हणतात.

देहली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांच्या घरावर आक्रमण

देहलीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे ही घटना दर्शक आहे ! याविषयी केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा !

अरबी देश इस्लामी नियम नाकारत आहेत, तर भारत स्वीकारत आहे ! – तस्लिमा नसरीन

अरब देश हळूहळू इस्लामी नियम नाकारत आहेत; मात्र बिगर अरबी देश उदाहरणार्थ भारत इस्लामी नियम त्वरित स्वीकारत आहेत’, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केली आहे.

गोपाल इटालिया यांनी आता पंतप्रधान मोदी यांच्‍या आईविषयी अपशब्‍द उच्‍चारले !

गुजरात आणि केंद्रात भाजपचे सरकार असतांना इटालिया यांच्‍यावर अद्याप कारवाई होत नाही, हे आश्‍चर्यकारकच होय !