त्रेतायुगापासून दिवाळी सणाला प्रारंभ झाला ! – कु. कृतिका खत्री, प्रवक्त्या, सनातन संस्था

‘दीपावली’ हा शब्द ‘दीप’ आणि ‘आवली (ओळ)’ या शब्दांनी बनला आहे. त्याचा अर्थ दिव्यांची ओळ असा आहे. त्रेतायुगात १४ वर्षांचा वनवास संपवून प्रभु श्रीराम अयोध्येला परतले. त्या वेळी अयोध्यवासियांनी दीपोत्सव साजरा केला होता. तेव्हापासून दीपावली हा सण चालू झाला आहे.

धर्माच्या नावाखाली आपण कुठे पोचलो आहोत ? – सर्वोच्च न्यायालय

लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता असलेल्या देशामध्ये द्वेषापायी करण्यात येणारी हिंसा अन् वक्तव्ये धक्कादायक आहेत, असे मत सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करतांना नोंदवले.

ताजमहालचे अन्वेषण करण्याविषयीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

‘ताजमहाल हे मूलत: शिवमंदिर आहे’, असे सांगणार्‍या आणि त्याचे तथ्याधारित अन्वेषण करण्याची मागणी करणार्‍या भाजपचे नेते रजनीश सिंह यांची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. ही याचिका ‘प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेली याचिका आहे’, असे न्यायालयाने म्हटले आहे.

(म्हणे) ‘गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला ‘जिहाद’ शिकवला !’

जर हिंदूंना जिहाद शिकवण्यात आला असता, तर जसे महंमद पैगंबर यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावर धर्मांध मुसलमान हिंदूंचा शिरच्छेद करत आहेत, तसे प्रतिदिन हिंदूंच्या देवतांचे विडंबन करणार्‍यांना हिंदूंनीही यमसदनी धाडले असते !

देहलीमध्ये चीनच्या महिला गुप्तहेराला अटक

इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात रशियाच्या गुप्तचर संस्था केजीबीच्या हस्तकांचा देशात सुळसुळाट झाला होता, असे म्हटले जाते. आता पाकिस्तानच्या हस्तकांचा सुळसुळाट असतांना चीनचेही गुप्तचर भारतात कारवाया करत आहेत, हे पहाता ‘भारत या देशांसाठी धर्मशाळाच झाली आहे का ?’, असा प्रश्‍न पडतो !

प्रदूषणग्रस्त देहली !

देहली सरकारकडून प्रदूषण प्रतिबंधात्मक गोष्टी होत नसतील, तर केंद्र सरकारने हस्तक्षेप करून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या उपाययोजना कशा होतील, ते पाहिले पाहिजे; अन्यथा चीनप्रमाणे एक मास सर्वच बंद करून सर्वांनाच घरात बसावे लागेल. परिस्थिती अशीच गंभीर राहिल्यास देहलीतही तो दिवस दूर नाही, हे निश्‍चित !

कोरोना अद्यापही जागतिक आणीबाणी ! – जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना अद्यापही जागतिक आणीबाणी असल्याचे सांगितले आहे. कोरोनासंबंधी आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमन आपत्कालीन समितीने बैठक घेतल्यानंतर ही घोषणा करण्यात आली.

आतंकवादाच्या सावटाखाली क्रिकेट खेळता येणार नाही !  

आतंकवादाच्या सावटाखाली क्रिकेट खेळता येणार नाही. भारतीय क्रिकेट खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन भारताचे क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी केले.

रेल्वेगाड्यांमध्ये प्रति प्रवासी सामान नेण्याचा नियम निश्‍चित

रेल्वेगाड्यांमधील स्लीपर कोच, तसेच अन्य गाड्यांमध्ये टियर-२ सामान नेण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासनाने नियम निश्‍चित केले आहेत. प्रवाशाच्या तिकिटानुसार त्याने न्यायच्या सामानाचे वजन निश्‍चित केले जाते आणि त्यानुसार रेल्वेगाडीमध्ये सामान नेले जाऊ शकते.

चित्रपटावर स्थगिती आणण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय तो प्रदर्शित केलेल्या दिनांकानंतर करणार सुनावणी !

या निर्णयातून सर्वोच्च न्यायालयाला काय म्हणायचे आहे, हे सर्वसाधारण जनतेला स्पष्ट व्हायला हवे !