रशिया-युक्रेन युद्धातून भारत काय शिकू शकतो ?

जेव्हा कठीण वेळ येतो, तेव्हा संपूर्ण देश एकत्र येतो, भारतानेही अशा प्रकारची लढाई लढण्याची आवश्यकता आहे. युक्रेन युद्धाचा एक भारतीय या नात्याने अभ्यास करू शकतो.

चीनने संरक्षण खर्चात केली ७.१ टक्के वाढ !

चीनने त्याच्या संरक्षण खर्चामध्ये ७.१ टक्क्यांनी वाढ केली आहे. चीनने वर्ष २०२२ च्या आर्थिक वर्षासाठी १७ लाख ७५ सहस्र कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही तरतूद भारताच्या संरक्षण खर्चाच्या तिप्पट आहे.

देशहितासाठी भारताने प्रथम अणूआक्रमण करण्याचीही सिद्धता ठेवावी ! – भरत कार्नाड, संरक्षण आणि भूराजकीय तज्ञ

भारताने आता ‘अण्वस्त्रांचा प्रथम वापर नाही’, हे धोरण पालटले पाहिजे, तसेच देशाहितासाठी आवश्यक असल्यास प्रथम अणूआक्रमण करण्याचीही सिद्धता ठेवली पाहिजे.

संरक्षण मंत्रालयाच्या अर्थसंकल्पीय खर्चावर देखरेख करण्यासाठी समिती स्थापन करणार ! – राजनाथ सिंह

संरक्षण मंत्रालयाच्या अर्थसंकल्पीय खर्चावर देखरेख करण्यासाठी तिन्ही दलांच्या प्रतिनिधींसह एक समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथ दिली.

युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम आणि भारताची भूमिका !

नाटो’मध्ये लढण्याची क्षमता राहिली नाही, हे रशियाला समजले आहे. दुर्दैवाने ते चीनलाही कळलेले आहे. त्यामुळे चीन रशियासारखा प्रकार तैवानमध्ये करू शकतो का ? चीन भारताच्या लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये असा प्रकार करू शकतो का ? आणि केला, तर काय होईल ?

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशाखापट्टणम् येथे नौदलाचा ‘फ्लीट रिव्ह्यू’ !

सुरक्षादलांचे सर्वोच्च कमांडर असलेले राष्ट्रपती कोविंद यांनी नौदलातील ६० जहाजे आणि पाणबुड्या, तसेच ५५ विमाने यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आढावा घेतला.

लडाख येथील सीमेविषयीच्या कराराचे चीनकडून उल्लंघन होत आहे ! – भारत

भारताने चीनला त्याला समजेल अशा भाषेत सुनावले पाहिजे !

शत्रू राष्ट्रांशी भविष्यात काय संघर्ष होऊ शकेल, याची चुणूक आम्हाला सध्या दिसत आहे ! – सैन्यदलप्रमुख नरवणे

केवळ आघाडीवरूनच नव्हे, तर विविध माहितीस्रोत, सायबर विश्‍व, वादग्रस्त सीमा येथे या घडामोडी घडत आहेत, असे विधान भारतीय सैन्यदलप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी केले आहे

अर्थसंकल्पातील संरक्षणाविषयीची तरतूद म्हणजे ‘आत्मनिर्भर’ भारताच्या दिशेने होणारी वाटचाल !

माजी संरक्षण मंत्री पर्रीकर म्हणाले होते, ‘पुढील ५ ते ७ वर्षांमध्ये भारताला लागणारी प्रत्येक शस्त्रसामुग्री आपण भारतातच बनवू.’ हा अर्थसंकल्प, म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.’

काँग्रेसच्या राज्यापेक्षा पंतप्रधान मोदी पाकिस्तानात अधिक सुरक्षित ?

नरेंद्र मोदी यांना पंजाबमध्ये मिळणारा जो प्रतिसाद आहे, त्याला घाबरून पंजाबच्या काँग्रेस सरकारने आणि पक्षाने असा अपशकुन घडवण्याचा प्रयत्न केला होता का ? आणि केला असेल, तर काही हरकत नाही; कारण नरेंद्र मोदी या सर्वांना पुरून उरलेले आहेत !