गोव्यात दिवसभरात कोरोनाबाधित २६५ नवीन रुग्ण
गोव्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याची टक्केवारी १२.८८ झाली आहे, तर राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २ सहस्र ७७ झाली आहे.
गोव्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याची टक्केवारी १२.८८ झाली आहे, तर राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २ सहस्र ७७ झाली आहे.
राजेंद्र सरग यांनी पुण्यासमवेत बीड, नगर, परभणी अशा अनेक ठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले होते. राज्यातील विविध दैनिके, साप्ताहिके आणि दिवाळी अंकांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून ते विनामूल्य व्यंगचित्र करून देत असत.
कोरोनाची लस घेतल्यानंतर ४८ घंट्यांच्या आत केपे येथील एका ३२ वर्षीय व्यक्तीचे निधन झालेे.
लेखक जगन्नाथ केशव कुंटे उपाख्य स्वामी अवधूतानंद यांचे ४ मार्च या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, २ मुले, मुलगी आणि जावई असा परिवार आहे.
श्री सिद्धेश्वर देवस्थानचे पंच, तसेच प्रख्यात वीरशैव मराठी साहित्यिक अन् संगमेश्वर महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक डॉ. शे.दे. पसारकर (वय ६८ वर्षे) यांचे २४ फेब्रुवारीच्या रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुली, जावई, नातवंडे, असा परिवार आहे.
ठाण्याचे माजी महापौर, माजी आमदार, कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते आणि शिवसेना उपनेते अनंत तरे (वय ६६ वर्षे) यांचे २२ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी येथील ज्युपिटर रुग्णालयात निधन झाले. मेंदूतील रक्तस्रावामुळे त्यांच्यावर मागील दोन मासांपासून उपचार चालू होते.
माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांचे १५ फेब्रुवारी या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्या पुण्यातील रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. १६ फेब्रुवारी या दिवशी सकाळी बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
सनातनचे हितचिंतक गुरुप्रसाद नत्थुलाल जयस्वाल (वय ८९ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने २३ जानेवारी २०२१ या दिवशी दुःखद निधन झाले.
श्रीनिवास तळवलकर यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण स्वाध्याय परिवारावर शोककळा पसरली आहे.
घाटकोपर, मुंबई येथील सनातनच्या साधिका हेमलता कार्लेकर यांचे यजमान आणि सनातन संस्थेचे हितचिंतक विजय कार्लेकर (वय ६७ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.