सोलापूर – येथील श्री सिद्धेश्वर देवस्थानचे पंच, तसेच प्रख्यात वीरशैव मराठी साहित्यिक अन् संगमेश्वर महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक डॉ. शे.दे. पसारकर (वय ६८ वर्षे) यांचे २४ फेब्रुवारीच्या रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुली, जावई, नातवंडे, असा परिवार आहे.
डॉ. शे.दे. पसारकर यांनी संशोधन आणि साहित्य निर्मिती यांमध्ये मोलाची कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामगिरीविषयी काशी येथील जगद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी सोलापूर येथील शिवानुभव मंगल कार्यालय येथे ‘शिवकवी’ हा काशीपीठाचा पुरस्कार देऊन त्यांना गौरवले होते.