शिवसेनेचे ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे यांचे निधन

अनंत तरे

ठाणे – ठाण्याचे माजी महापौर, माजी आमदार, कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते आणि शिवसेना उपनेते अनंत तरे (वय ६६ वर्षे) यांचे २२ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी येथील ज्युपिटर रुग्णालयात निधन झाले. मेंदूतील रक्तस्रावामुळे त्यांच्यावर मागील दोन मासांपासून उपचार चालू होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, दोन नातवंडे आणि भाऊ असा परिवार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तरे यांचा नेहमीच सन्मान केला. त्यामुळे तरे तीन वेळा ठाण्याचे महापौर झाले. ते गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे उपनेते आणि अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचेे अध्यक्ष होते. कार्ला येथील एकविरा देवस्थान ट्रस्टचे ते अध्यक्षही होते.