जगात पहिल्यांदाच माणसामध्ये आढळला बर्ड फ्लूचा संसर्ग

चीनच्या हेनान प्रांतात बर्ड फ्लूच्या ‘एच्३एन्८’ प्रकाराच्या पहिल्या मानवी संसर्गाची नोंद झाली आहे. जगात बर्ड फ्लूचा माणसामध्ये आढळलेला हा पहिलाच संसर्ग आहे.

भारताचे शत्रू आणि त्यांच्याशी लढण्याची सिद्धता !

भारताचे शत्रु अणि आणि त्यांच्याशी लढण्यासाठी भारताची आणि शत्रु राष्ट्रांची सिद्धतेविषयीचा अभ्यास येथे दिला आहे.

लडाखमध्ये चीनची पुन्हा कुरापत : नियंत्रणरेषेजवळ ३ भ्रमणभाष मनोरे उभारले !

कुरापतखोर चीनला समजेल अशा भाषेत उत्तर दिल्यास तो ताळ्यावर येईल, हे लक्षात घेऊन भारताने आक्रमक भूमिका अवलंबणे आवश्यक !

चीनमध्ये कोरोनाच्या नव्या संसर्गामुळे २० लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता !

दळणवळण बंदीमुळे चीनच्या विकासदरावर परिणाम होत आहे. चीनचा तंत्रज्ञान उद्योग ठप्प आहे.

‘भारताला डिवचल्यास सोडणार नाही’, हा संदेश चीनला गेला आहे !  

राजनाथ सिंह यांची अमेरिकेतून चीनला थेट चेतावणी
‘भारताला कुणीही डिवचण्याचा विचारही मनात आणू नये’, अशी पत भारताने निर्माण केली पाहिजे !

चीन तिबेटची संस्कृती नष्ट करून स्वतःची संस्कृती लादण्याचा प्रयत्न करत आहे ! – पेंपा त्सिरिंग, राष्ट्रपती, तिबेट

चीनने धर्मगुरु लामा नियुक्त करण्याची परंपरा खंडित केली असून तिबेटीयन संस्कृती जपणारा धर्मगुरु लामा पालटून चिनी संस्कृतीचा लामा आमच्यावर थोपवला आहे.

रशिया-चीन यांच्यातील व्यापारी संबंधांमध्ये ३० टक्क्यांनी वाढ !

उभय देशांमधील व्यापार पाहिला, तर गेल्या तिमाहीत यामध्ये तब्बल ३० टक्क्यांची वाढ झाली आहे, असे रशियाची सरकारी वृत्तवाहिनी ‘रशिया टुडे’ने म्हटले आहे. यामुळे आर्थिक जग विभागले जात असल्याचे आणि त्यातून नवीन समीकरणे सिद्ध होत असल्याचे दिसून येत आहे.

चीनवर डोळे झाकून विश्वास ठेवणे भारताला महागात पडले !

चीन आक्रमकपणे कारवाया करत असतांना आमचे डोळे का उघडले नाहीत ? भारताने नेमकी चूक कुठे केली ? भारताने तिबेटला चीनचा भाग समजण्याची चूक केली आणि पंचशीलच्या सिद्धांतांवर डोळे झाकून विश्वास ठेवला. शांती टिकवून ठेवण्यासाठी आपण युद्धाची कूटनीती विसरलो. परिणामी भारताचे स्वतःच्या लष्करी सिद्धतेकडे दुर्लक्ष झाले !

श्रीलंकेने आणीबाणी उठवली

राजधानी कोलंबोमध्ये मुसळधार पावसात सहस्रो विद्यार्थ्यांनी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या घरावर मोर्चा काढला. ‘सरकारने चीनला सर्व काही विकून टाकल्याने सरकारकडे आता पैसेच नाहीत’, असा आरोप आंदोलकांनी केला.

चीनमधील २.६ कोटी शांघायवासियांची कोरोना चाचणी होणार !

चिनी सरकारच्या ‘डायनॅमिक झीरो पॉलिसी’ म्हणजे परिस्थितीनुरूप कोरोनाला पूर्ण पायबंद करण्याच्या धोरणामुळे अनेक प्रांतांमध्ये दळणवळण बंदी कठोरतेने राबवली जात आहे.