
बीजिंग (चीन) – जगभरात कोरोनाचा प्रभाव न्यून झाला असून निर्बंधही उठवण्यात आले आहेत; मात्र ज्या चीनमधून कोरोनाची उत्पत्ती झाली, त्या चीनच्या शांघाय शहरात संपूर्ण दळणवळण बंदी लागू करण्यात आली आहे. चीनच्या ‘शून्य कोरोना’ धोरणामुळे शहरातील अडीच कोटी नागरिक घरातून बाहेर पडू शकत नाहीत. चीनच्या ५ प्रांतांमध्ये आंशिक दळणवळण बंदी आहे. १५ कोटी लोकांना याचा फटका बसला आहे.
चीनमध्ये सध्याच्या संसर्गात २० लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.दळणवळण बंदीमुळे चीनच्या विकासदरावर परिणाम होत आहे. चीनचा तंत्रज्ञान उद्योग ठप्प आहे. १० मोठ्या आस्थापनांचे बाजारमूल्य १२९ लाख कोटी रुपयांनी खाली आले आहे. ही स्थिती असतांना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे रशिया-युक्रेन यांच्या युद्धात रशियाची बाजू घेत आहेत. यामुळे अमेरिका-युरोप यांच्याशी चीनचे संबंध बिघडण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम चीनच्या व्यवसायावर पडण्याची शक्यता आहे.
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
Bangladesh President Resigns : बांगलादेशाचे राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांचे त्यागपत्र
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Recognize Israel : नागरी अणू करारासाठी सौदी अरेबियाने इस्रायलला मान्यता द्यावी !
Germany Narcissists Country : संशोधन : जर्मनीत सर्वाधिक आत्ममुग्ध (नार्सिसिस्ट) लोकांचा भरणा !