१. रुग्णाईत असूनही नागपूर येथील प्रसाराचे दायित्व सांभाळणे
‘सौ. नम्रता शास्त्री यांच्याकडे नागपूर येथील अध्यात्मप्रसाराचे दायित्व होते. मागील २ वर्षे त्या फोंडा, गोवा येथे घरी राहून वैद्यकीय उपचार घेत होत्या. तेव्हा त्या रुग्णाईत असूनही नागपूर येथील प्रसाराचे दायित्व सांभाळत होत्या. कालांतराने त्यांच्या शारीरिक त्रासांत वाढ झाल्याने त्यांचे दायित्व पालटले. सध्या त्या मिरज येथे वैद्यकीय उपचार घेत आहेत.
२. नागपूर येथील साधकांना विज्ञापने मिळवून देणे आणि तेथील साधकांच्या अडचणी सोडवण्यास साहाय्य करणे
नागपूर येथील साधकांना वर्ष २०२५ च्या पंचांगासाठी विज्ञापने घेतांना अडचणी येत होत्या. तेव्हा साधकांनी या अडचणींविषयी सौ. शास्त्रीकाकूंना संपर्क केला. तेव्हा काकूंनी मिरज येथून काही विज्ञापनदात्यांना भ्रमणभाषद्वारे संपर्क केले आणि आवश्यक तेवढी विज्ञापने मिळवून दिली. तसेच काकू ‘नागपूर येथील साधकांना अधून मधून संपर्क करून अन्य काही अडचणी आहेत का ?’, असे विचारून त्यांना साहाय्य करण्याचा प्रयत्न करतात.’
– पू. अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे (समष्टी) संत), अमरावती (२.६.२०२४)