१. धर्मप्रेमीच्या पत्नीचा साधनेला तीव्र विरोध असणे आणि पत्नी समवेत वाद झाल्यावर धर्मप्रेमीने नामजप करणे अन् काही वेळाने पत्नी शांत होणे
‘अकोला येथील एक धर्मप्रेमी बर्याच वर्षांपासून धर्मकार्यात सहभागी होत आहेत. ते अकोला येथील महानगरपालिकेत अभियंता आहेत. त्यांच्या पत्नीचा यजमानांच्या साधनेला तीव्र विरोध आहे. सेवेत सहभागी होण्यासाठी कधी पत्नी समवेत वाद झाला, तर ते शांत राहून ‘जय गुरुदेव’ किंवा ‘हरि-विठ्ठल’ असा नामजप करतात. काही वेळाने पत्नी शांत होते.
२. ‘शिबिराला नेणे शक्य नाही’, असे पत्नीला सांगितल्यावर ती चिडणे आणि यजमानांची साहित्य भरलेली बॅग पत्नीने लपवून ठेवणे
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील एका शिबिरासाठी त्या धर्मप्रेमीची निवड झाली होती. ते त्यांनी पत्नीला सांगितल्यावर ती म्हणाली, ‘‘मलाही आश्रमात यायचे आहे.’’ पतीने सांगितले, ‘‘ते आता शक्य नाही.’’ तेव्हा पत्नी चिडली आणि म्हणाली, ‘‘तुम्ही जाता कसे ? ते मी पहाते !’’ प्रवासाला जायच्या दिवशी पत्नीने त्यांचे कपडे भरलेली ‘बॅग’ लपवून ठेवली. गाडीची वेळ होत आली, तरी पत्नी ‘बॅग’ देत नव्हती.
३. पू. पात्रीकरकाका यांनी सनातन संस्थेची आदर्श अशी कार्यपद्धत पत्नीला समजावून सांगणे आणि तिने यजमानांची ‘बॅग’ परत करणे अन् ते शिबिराला जाऊ शकणे
शेवटी त्यांनी मला भ्रमणभाष केला आणि म्हणाले, ‘‘पत्नीला समजावून सांगा.’’ मी त्यांच्या पत्नीला सांगितले, ‘‘सनातन संस्थेची आदर्श अशी एक कार्यपद्धत आहे. आता तुम्ही यजमानांच्या समवेत गेलात, तर तुम्हाला गोव्यातील प्रेक्षणीय स्थळे पहाता येणार नाहीत. त्यापेक्षा तुम्ही दिवाळीच्या कालावधीत गोवा पहायला जा आणि तेव्हा आश्रमही पहा. मी तसे नियोजन करतो.’’ त्यानंतर पत्नीने यजमानांना ‘बॅग’ परत दिली आणि ते धर्मप्रेमी शिबिरासाठी जाऊ शकले.’’
– पू. अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे (समष्टी) संत),अमरावती (४.६.२०२४)