बलुचिस्तानमध्ये सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात १ जण ठार
शाहबाज शरीफ यांनी नुकतेच चमनमधील नागरिकांवर अफगाण सीमा दलाच्या सैनिकांनी केलेल्या बेछूट गोळीबाराचा निषेध केला होता. त्यानंतर ४ दिवसांनी गोळीबाराची ही घटना पुन्हा घडली आहे.
शाहबाज शरीफ यांनी नुकतेच चमनमधील नागरिकांवर अफगाण सीमा दलाच्या सैनिकांनी केलेल्या बेछूट गोळीबाराचा निषेध केला होता. त्यानंतर ४ दिवसांनी गोळीबाराची ही घटना पुन्हा घडली आहे.
चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने अरुणाचल प्रदेशातील तवांग येथील यांगत्सेमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला होता; मात्र भारतीय सैन्याने चिनी सैन्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे चिनी सैन्याला परत फिरणे भाग पडले.
‘लडाखमधील सीमारेषा पालटण्यासाठी केलेल्या प्रयत्नाच्या यशाने हुरळून जाऊन तवांगमधील सीमारेषा पालटता येईल’, असा चीनने विचार केला. लडाखमधील सीमारेषेवरील भूमी त्यांनी चोरून बळकावली आहे, हे ते विसरले. तवांगमध्ये त्यांना (चीनला) अपमानास्पद माघार घ्यावी लागली.
भारत हा असा देश आहे ज्याने जगाला दाखवून दिले आहे की, शेजार्यांच्या दादागिरीला आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो. आम्ही सदैव सिद्ध आहोत.
चीनची विस्तारवादाची भूक आसुरी आहे. चीनची सीमा तब्बल १४ देशांना लागून आहे. या ‘ड्रॅगन’ने भारताचा मोठा भूभाग आधीच गिळंकृत केला असून त्याला आता अरुणाचल प्रदेशही हवा आहे. त्यामुळे चीनला व्यापार, राजकारण, संरक्षण आधी सर्वच पातळ्यांवर धडा शिकवून नामोहरम करावे लागेल.
भारत हा कायमच शेजराच्या देशांसमवेत शांतता आणि चांगले संबंध रहावे, यासाठी प्रयत्नशील असतो; मात्र त्याचा अर्थ ‘भारत दुर्बल आहे’, असा घेतला जाऊ नये.
या व्हिडिओमध्ये ३०० हून अधिक चिनी सैनिक तात्पुरत्या भिंतीवरील कुंपण तोडून भारतीय सीमेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करताच सज्ज भारतीय सैनिकांनी त्यांना जोरदार प्रतिकार करत त्यांना चोप दिला.
हाँगकाँगच्या ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तात म्हटले आहे की, संघर्ष झाल्यानंतर दोन्ही सैन्य आपापल्या भागात परतले. यात २० भारतीय सैनिक घायाळ झाले आहेत. भारतापेक्षा चीनचे सैनिक अधिक संख्येने घायाळ झाले.
चीन अशा कुरापती काढतच रहाणार आहे. त्याला योग्य धडा शिकवल्यावरच त्याच्या अशा कुरापती बंद होतील. त्यासाठी भारताने प्रयत्न करणे आवश्यक आहे !
भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या सुरक्षासंबंधी समितीने अरुणाचल प्रदेशात भारत-चीन सीमेवर समांतर रस्ता बांधण्याची अनुमती दिलेली आहे.