बलुचिस्तानमध्ये सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात १ जण ठार

काबुल – अफगाणिस्तानच्या सीमेवर तैनात असलेल्या अफगाणी सैनिकांनी  बलुचिस्तान प्रांतातील चमन भागात केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १ जण ठार आणि १२ हून अधिक जण घायाळ झाले. ‘या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे’, असे पाकिस्तानच्या संरक्षण सूत्रांनी सांगितले. चमन हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र मानले जाते.  अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने मात्र पाकिस्तानने चकमक चालू केल्याचा आरोप केला आहे.


पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नुकतेच चमनमधील नागरिकांवर अफगाण सीमा दलाच्या सैनिकांनी केलेल्या बेछूट गोळीबाराचा निषेध केला होता. त्यानंतर ४ दिवसांनी गोळीबाराची ही घटना पुन्हा घडली आहे. यापूर्वी झालेल्या गोळीबारात ७ जण ठार, तर १६ जण घायाळ झाले होते.