प.पू. भक्तराज महाराज यांनी वापरलेल्या चैतन्यमय गाडीच्या संदर्भात साधकाला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आणि त्याने रेखाटलेली भावचित्रे !

नामजप करत असतांना मला जाणवले, ‘प.पू. बाबांची गाडी, म्हणजे साक्षात् शेषनाग आहे आणि त्यावर श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर पहुडले आहेत.’

चंद्रपूर येथील सौ. भारती पवार यांना सत्संगसेवक शिबिराच्या वेळी आलेल्या अनुभूती !

‘१९.१.२०२४ ते २१.१.२०२४ या कालावधीत मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘मराठी सत्संगसेवक शिबिरा’मध्ये सहभागी झाले होते. तेव्हा मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

चारचाकीच्या अपघातात सद्गुरु स्वाती खाडये आणि साधक यांनी अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा !

ज्या ठिकाणी तुमच्या वाहनाला अपघात झाला, त्या ठिकाणी या पूर्वी बरेच अपघात झाले आहेत; मात्र त्या अपघातात कुणीच वाचले नाहीत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याविषयी आलेल्या अनुभूती

‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ एका वनात झाडाखाली बसल्या आहेत. त्यांच्या डोक्यावर फुलांचा मुकुट आहे. त्यांच्याकडे आलेल्यांना त्या फुले देऊन आशीर्वाद देत आहेत. मी ते सर्व पहात आहे.

सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या चैतन्यमय स्पर्शामुळे साधिकेची शस्त्रकर्म केलेली जखम लवकर भरून येणे

आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘तुमची जखम एवढी लवकर कशी काय भरली ?’’ आधुनिक वैद्यांना याचे पुष्कळ आश्चर्य वाटले. संतांच्या चैतन्यमय स्पर्शाने अशक्य ते शक्य झाले.

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘दशदिक्पाल पूजन’ आणि ‘मेधा-दक्षिणामूर्ती’ याग या वेळी साधकाला जाणवलेली सूत्रे

पूजाविधी आपण देवतांच्या आव्हानासाठी करतो; पण या वेळी ‘देवतांना आवाहन करण्यापूर्वीच देवता येऊन कार्य करू लागल्या आणि त्यानंतर पूजा झाली’, असे मला जाणवले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे साधिकेला मनाचे चिंतन करतांना सुचलेली विचारप्रक्रिया

‘संतांच्या वाणीमुळे आपल्यातील अनिष्ट शक्ती, स्वभावदोष आणि अहं नष्ट होऊ देत’, अशी प्रार्थना केली पाहिजे. ईश्वर सर्वगुणसंपन्न आहे.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या आध्यात्मिक सामर्थ्याची साधिकेला आलेली प्रचिती !

सद्गुरु पिंगळेकाका माझ्यापासून ५ – ६ फूट दूर बसून नामजपादी उपाय  करत होते, तरीही माझ्या अनाहतचक्रावरील आवरणाचा भेद होऊन ते विशुद्धचक्रापर्यंत आले.

सौ. आशा वट्टमवार यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात आलेल्या अनुभूती

श्री दुर्गादेवीच्या मूर्तीकडे पाहून मला पुष्कळ चांगले वाटले. ‘त्या मूर्तीकडे एकटक पहात रहावे’, असे मला वाटत होते. ‘मला मूर्तीमधून तेजतत्त्व भरभरून मिळत आहे आणि तिच्या हातातील प्रत्येक शस्त्राने माझे स्वभावदोष अन् अहं नष्ट होत आहेत’, असे मला जाणवत होते.