श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याविषयी आलेल्या अनुभूती

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

१. ‘स्वतःच्या जीवनाचा उद्देश ‘गुरुकार्याचे संकीर्तन करणे’, हाच आहे’, असे वाटणे

‘माझे जीवन हे ‘श्री सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या अवतारी कार्याच्या प्रसारासाठीच आहे आणि त्यांच्या कार्याचे कीर्तन आणि संकीर्तन करणे, हाच माझ्या जीवनाचा उद्देश आहे’, असे मला वाटते.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

२. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यासमोर बालकभावात रहाता येणे, याची कारणमीमांसा

श्रीसत्शक्ति सौ. सिंगबाळ यांना महर्षींनी ‘महालक्ष्मी’चा अवतार, म्हणजे भूदेवी म्हणून सांगण्यापूर्वी गुरुदेवांनी मला स्वप्नात एक दृष्टांत दिला. त्यात मला पुढील दृश्य दिसले, ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ एका वनात झाडाखाली बसल्या आहेत. त्यांच्या डोक्यावर फुलांचा मुकुट आहे. त्यांच्याकडे आलेल्यांना त्या फुले देऊन आशीर्वाद देत आहेत. मी ते सर्व पहात आहे. त्या वेळी गुरुदेवांनी मला सांगितले, ‘या तुझ्या आई आहेत आणि तुला यांची सेवा करायची आहे.’ तेव्हापासून त्यांना पाहिल्यावर माझा बालकभाव जागृत होतो.

३. स्वप्नात श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ साधिकांना फुले देत असल्याचे पहाणे आणि प्रत्यक्षातही तसेच दिसणे

नंतर काही दिवसांनी मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आलो होतो. तेव्हा प्रत्यक्ष श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ त्यांच्या खोलीत ज्या साधिका ये-जा करत होत्या, त्यांना निर्माल्यातील गजरे आणि फुले प्रसाद स्वरूपात देत होत्या. त्या वेळी मी जे स्वप्नात पाहिले होते, ते मला प्रत्यक्ष अनुभवता आले.’

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र्रीय मार्गदर्शक. (१०.८.२०२३)

जुलै २०२३ मध्ये झालेल्या २ शिबिरांमधून लक्षात आलेली सूत्रे !

अ. ‘जुलै २०२३ मध्ये झालेली २ शिबिरे ही वर्तमानकाळातील नियोजनानुसार झाली’, असे अनुभवता आले.

आ. भगवंत वर्तमानात असतो. त्या त्या क्षणी भगवंताला जे अपेक्षित होते, तशी ही शिबिरे पार पडली आणि ती सर्वांना आनंददायी, प्रेरणादायी अन् दिशादर्शक झाली.

इ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या मार्गदर्शनामुळे साधकांसह मलाही या शिबिरांतून पुष्कळ शिकायला मिळाले.’

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक. (१०.८.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक