१. संत अहं न्यून करण्यासाठी साधकाला साहाय्य करत असणे आणि अनिष्ट शक्ती स्वभावदोषांच्या साहाय्याने साधकांच्या मनावर नियंत्रण मिळवत असणे
‘आपला अहंचा संस्कार न्यून करण्यासाठी संत आपल्याला रागावतात किंवा आपली चूक सांगतात. संत आपल्याला रागावतात; म्हणून आपल्या मनाला वाईट वाटते. ज्या वेळी एखादी व्यक्ती किंवा संत आपले स्वभावदोष किंवा अहं यांचे पैलू सांगून ते न्यून करण्याचा प्रयत्न करत असतील, त्या वेळी अनिष्ट शक्ती आपल्या मनातील नकारात्मक विचार वाढवतात. तेव्हा ‘मनात येणारे नकारात्मक विचार हे आपले नसून ते अनिष्ट शक्तीचे आहेत’, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. अनिष्ट शक्ती आपले स्वभावदोष आणि अहं न्यून होण्यास साहाय्य करत नाहीत; कारण त्यांच्या साहाय्याने त्या आपल्या मनावर नियंत्रण मिळवतात.
२. साधकामध्ये जेवढे गुण, तेवढे ईश्वराचे अस्तित्व असणे आणि त्यासाठी साधकांनी स्वतःतील गुण वाढवून मनातील ईश्वराला जागृत करणे
अशा वेळी ईश्वराला आपले गुण वाढवण्यासाठी प्रार्थना करून अनिष्ट शक्ती नष्ट होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ‘संतांच्या वाणीमुळे आपल्यातील अनिष्ट शक्ती, स्वभावदोष आणि अहं नष्ट होऊ देत’, अशी प्रार्थना केली पाहिजे. ईश्वर सर्वगुणसंपन्न आहे. साधकामध्ये जेवढे गुण असतात, तेवढे ईश्वराचे अस्तित्व असते. त्यासाठी साधकांनी स्वतःतील गुण वाढवून मनातील ईश्वराला जागृत करायचे आहे.’
– कु. मनीषा माहुर , मथुरा सेवाकेंद्र (१३.६.२०२४)
|