१. आश्रमातील ध्यानमंदिरामध्ये गेल्यावर माझे डोके थोडे जड झाले.
२. श्री दुर्गादेवीच्या मूर्तीकडे पाहून मला पुष्कळ चांगले वाटले. ‘त्या मूर्तीकडे एकटक पहात रहावे’, असे मला वाटत होते. ‘मला मूर्तीमधून तेजतत्त्व भरभरून मिळत आहे आणि तिच्या हातातील प्रत्येक शस्त्राने माझे स्वभावदोष अन् अहं नष्ट होत आहेत’, असे मला जाणवत होते.
३. २०.१.२०२४ या दिवशी ध्यानमंदिरात आरती चालू असतांना ‘आरती करत असलेली देवता माझ्यासमोर आहे आणि मी त्या देवतेची आरती करत आहे’, असे मला जाणवत होते. त्यानंतर माझे मन शांत झाले.’
– सौ. आशा वट्टमवार (वय ५६ वर्षे), संभाजीनगर (१९.१.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |