शुद्ध प्रेम ही भक्ती (टीप) ।
भक्ती आहे समर्पण आणि त्याग ।।
भक्ती परेच्छा किंबहुना ईश्वरेच्छा ।
भक्ती आहे जीवनातील गोडवा ।। १ ।।
भक्ती आहे इतरांना समजून घेण्याची क्षमता ।
भक्ती सर्वांना स्वतःत सामावून घेण्याची क्षमता ।।
भक्ती सर्वांमध्ये परमात्मा पहाण्याची, अनुभवण्याची क्षमता
भक्ती ही सर्वांना आपलेसे करून घेण्याची क्षमता । ।। २ ।।
भक्ती ही अजातशत्रू अवस्था ।
भक्ती ही सर्वांतील परमात्म्याशी एकरूप होण्याचा रस्ता ।।
भक्ती ही सर्वांमधील सर्वव्यापकता अनुभवण्याची क्षमता ।
भक्त म्हणजे परमात्म अवस्था ।। ३ ।।
टीप : भक्ती ही एकाचीच म्हणजे सर्वव्यापक परमात्म्याचीच असते.
– सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती (१८.१२.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |