कोल्हापूर येथील युवा साधिका कु. गिरिजा शेंडे यांना आलेल्या अनुभूती !

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सत्संग घेत होत्या. तेव्हा ‘त्यांच्यात तेजतत्त्व कार्यरत आहे’, असे मला जाणवले. मला त्यांच्यातील तारक आणि मारक शक्तींचे दर्शन झाले. त्या म्हणाल्या, ‘‘आपल्याला स्वभावदोषांना समूळ नष्ट करायचे आहे.’..

‘भावपूर्ण प्रार्थना केल्यावर देव सेवेत साहाय्य करतो’, यासंदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !

मी कंबर दुखत असतांना सेवा चालू केली. माझी कंबर दुखण्याची जाणीव न्यून होऊ लागली. ‘माझ्या कमरेत वेदना होत आहेत’, हे मी विसरून गेलो आणि ‘सेवा कधी पूर्ण झाली ?’, हे मला कळले नाही.

सोलापूर येथील कै. (श्रीमती) शशिकला व्हटकर यांचे ‘आजारपण आणि त्यांचा मृत्यू’ या कालावधीत त्यांच्या कन्येला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दिव्य सामर्थ्याविषयी आलेल्या अनुभूती

आईच्या निधनानंतर ‘एका मागोमाग उभे असणार्‍या परात्पर गुरु डॉक्टरांनी आईचा देह त्यांच्या मागे उभ्या असलेल्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या हातात दिला आहे’, असे मला सलग १३ दिवस स्पष्टपणे दिसत होते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ आठवले यांच्या सत्संगात तळहात गुलाबी होण्याच्या संदर्भात साधिकांना आलेल्या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संपूर्ण सत्संगाच्या कालावधीत मला माझ्या दोन्ही हातांच्या बोटांची नखे, बोटे आणि तळहात गुलाबी रंगाचे झाल्याचे आढळले. त्या वेळी माझे मन पुष्कळ आनंदी होते आणि मला उत्साह जाणवत होता. सत्संग संपल्यानंतर अर्ध्या घंट्याने हळूहळू तो गुलाबी रंग न्यून झाला.’

यज्ञातील ज्वाळा, यज्ञाचा धूर आणि यज्ञाचे मंत्र यांचे आध्यात्मिक महत्त्व

‘‘यज्ञातील ज्वाळा, धूर आणि मंत्र यज्ञाशी संबंधित देवतेची शक्ती अनुक्रमे तेज, वायु आणि आकाश या तत्त्वांच्या स्तरावर कार्यरत असते. त्यामुळे यज्ञातील ज्वाळा, धूर आणि मंत्र यांमुळे यज्ञाला उपस्थित असणार्‍या व्यक्ती, प्राणी आणि वनस्पती यांच्याभोवतीचे रज-तम गुणांनी युक्त असणारे त्रासदायक आवरण नष्ट होऊन त्यांना चैतन्य मिळते. त्याचप्रमाणे यज्ञातील ज्वाळा, धूर आणि मंत्र यांतून प्रक्षेपित होणारी दैवी … Read more

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आल्‍यावर वाराणसी येथील श्री. शुभम विश्‍वकर्मा यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

ध्‍यानमंदिरात नामजप करतांना ‘प्रत्‍येक दिवशी गुरुदेव माझ्‍या स्‍थूल आणि सूक्ष्म देहांतून माझे अवगुण नष्‍ट करत आहेत अन् मला ईश्‍वराकडे, म्‍हणजे मोक्षाकडे घेऊन जात आहेत’, असे मला जाणवले.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या दिवशी झारखंड येथील साधकांना संगणकीय प्रणालीद्वारे कार्यक्रम पहातांना आलेल्‍या अनुभूती

११.५.२०२३ या दिवशी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्‍सव होता. त्‍या वेळी संगणकीय प्रणालीद्वारे कार्यक्रम पहातांना साधकांना आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत. 

वागणे, बोलणे आणि प्रत्येक कृती यांमधून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव व्यक्त होत असलेले पू. शिवाजी वटकर (वय ७८ वर्षे) !

‘आज १६.१०.२०२४ (आश्विन शुक्ल चतुर्दशी) या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनचे १०२ वे (समष्टी) संत पू. शिवाजी वटकर यांचा ७८ वा वाढदिवस आहे. ‘मी सनातन संस्थेत आल्यापासून माझा पू. शिवाजी वटकरकाकांशी संपर्क आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांची मर्दन (मालीश) सेवा करतांना श्री भवानीदेवीचे दर्शन होऊन साधिकेने अनुभवलेली भावस्थिती !

‘श्री भवानीदेवीचे सगुण रूप असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चरणांना मर्दन करण्याची सेवा माझ्याकडे होती. एकदा मी ‘देवीच्या सेवेला जात आहे’, हा भाव मनात ठेवून ही सेवा करण्यासाठी गेले. मी आणि सहसाधिका त्यांच्या पायापाशी बसलो अन् त्यांचे चरण हातात घेऊन आम्ही मर्दन (मालीश) करायला आरंभ केला…

वाढदिवशी नमन करतो आदिशक्ती ।

लीन होती चरणांपाशी ऊर्जा मिळे चैतन्याची ।
जगदंबेच्या स्मरणाने प्रत्येक साधकास येई प्रचीती ।।