११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव होता. त्या वेळी संगणकीय प्रणालीद्वारे कार्यक्रम पहातांना साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. श्रीमती रागिनी वर्मा (वय ७५ वर्षे), बोकारो, झारखंड.
अ. ‘मी एकटीच घरी बसून ब्रह्मोत्सवाच्या प्रक्षेपणाचा आनंद घेत होते. तरीही ‘तिन्ही मोक्षगुरु, सद़्गुरु, संत आणि सहसाधक माझ्या समवेत आहेत’, असे मला जाणवत होते.
आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना पाहून माझ्या डोळ्यांतून सतत भावाश्रू येत होते. ‘मी प्रत्यक्ष रामनाथी आश्रमात आहे’, असे मला वाटत होते.
इ. प्रक्षेपणाच्या वेळी भ्रमणसंगणकावर अगणित दैवी कण दिसत होते.
ई. दुपारी जेवल्यानंतर मला २ घंटे विश्रांती घेण्याची सवय आहे; पण प्रसारण पहातांना मला आळस आला नाही आणि झोपेचेही भान राहिले नाही. ही माझ्यावर गुरुकृपा होती. इतकेच नाही, तर प्रसारणाच्या नंतरही आनंदाची स्थिती तशीच होती. त्यामुळे नियमितच्या सेवा उत्साह आणि आनंदात पूर्ण झाल्या. माझा ४ घंटे वेळ कसा गेला ? हे मला कळलेच नाही.
उ. पुढील २ दिवस माझी भावस्थिती टिकून होती. मला सतत दैवी कण दिसत होते. मी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निःशब्द आहे.’
२. श्रीमती मीनू खैतान (वय ५८ वर्षे), धनबाद, झारखंड
२ अ. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सप्तचंडी यज्ञामध्ये हिना अत्तराची आहुती दिली जात असतांना धनबाद येथे साधिकेच्या हातातून अत्तराची बाटली भूमीवर पडून अत्तर सांडणे, ‘ही धरणीमातेने आहुती स्वीकारण्याची अनुभूती आहे’, असे साधिकेला वाटणे : ‘ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने होत असलेल्या सप्तचंडी यज्ञामध्ये हिना अत्तराची आहुती दिली जात होती. यज्ञ संपण्यापूर्वी माझ्या शेजारी बसलेल्या साधिकेने विचारले, ‘‘हे काय होत आहे.’’ तेव्हा मी तिला सांगितले, ‘‘यज्ञात हिना अत्तराची आहुती दिली जात आहे.’’ मी पुन्हा यज्ञ पाहू लागले. त्याच क्षणी तिच्या हातातून अत्तराची बाटली निसटून भूमीवर पडली आणि अत्तर भूमीवर सांडले. ही बाटली मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी दिली होती. बाटली ओळखण्यासाठी त्यावर मी श्री दुर्गादेवीचे चित्र लावले होते. ती अत्तराची बाटली फुटली नव्हती; परंतु अत्तर सांडले होते. हे पाहून साधिका मला म्हणाली, ‘‘तेथे यज्ञात अत्तराची आहुती दिली जात आहे, तर येथे धरणीमातेने श्री दुर्गादेवीच्या रूपात अत्तराची आहुती घेतली.’’ त्यानंतर मला बाटलीवरील श्री दुर्गादेवीच्या चित्रावर अनेक दैवी कण दिसले. हे मी अन्य साधकांना दाखवले. तेव्हा एका साधिकेला असे लक्षात आले, ‘भूमीवर ज्वाळांसारखी आकृती दिसत आहे.’ आम्हाला ही अनुभूती दिल्याबद्दल कोटीशः कृतज्ञता.’
२ आ. दिव्याच्या ज्योतीमध्ये मला २ वेळा सुदर्शनचक्राचे दर्शन झाले.’
३. सौ. निकिता उपाध्याय (वय ३७ वर्षे), कोलकाता
अ. ‘रथामध्ये आरूढ झालेल्या गुरुदेवांना पाहून माझ्याकडून आपोआप प्रार्थना झाली. तेव्हा ‘माझे अनाहतचक्र आणि विशुद्धचक्र यांच्याकडे विविध रंगांचे ऊर्जास्रोत येत आहेत’, असे मला जाणवत होते.
आ. माझी २ वेळा भावजागृती झाली. तसेच गुरुदेवांच्या चेहर्यावर गुलाबी रंगाची छटा दिसत होती. त्या वेळी जणूकाही ‘ते प्रीतीचा अथांग सागर आहेत’, असे मला जाणवले.
इ. दुसर्या दिवशी काहीही प्रयत्न न करता माझे ध्यान लागले. मी बोटांची मुद्रा केल्यावर तेथे अग्नी असल्याचे जाणवले.’
४. डॉ. श्रिया साहा (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय २९ वर्षे), कोलकाता
४ अ. ‘ब्रह्मोत्सवाचे थेट प्रक्षेपण बघतांना जेव्हा ‘ड्रोन’च्या माध्यमातून रथावर पुष्पवृष्टी होत होती, तेव्हा मला सतत सुगंध येत होता.’
५. श्री. शंभु गवारे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४७ वर्षे), पूर्वोत्तर भारत
५ अ. ब्रह्मोत्सवाची पूर्वसूचना मिळणे : ‘काही मासांपासून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची मानस पूजा करतांना मला जवळजवळ प्रत्येक दुसर्या दिवशी जसे भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या दरबारात (राजसभेत) बसत होते आणि जनता जनार्दन तेथे येत होती, तसे ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव एका भव्य दरबारात बसले आहेत आणि सर्व साधक, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, ‘सनातन प्रभात’चे वाचक अन् हितचिंतक उपस्थित आहेत’, असे मला दिसत होते. ब्रह्मोत्सवाचे प्रक्षेपण पहात असतांना ही अनुभूती आली असल्याचे माझ्या लक्षात आले. गुरुदेवांनी मला उत्सवापूर्वीच हे दाखवले. यासाठी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि भावजागृती झाली.’
६. श्रीमती मधुलिका गोयल (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ३३ वर्षे), जमशेदपूर, झारखंड
६ अ. कार्यक्रम पहाण्याच्या बैठककक्षाचे आकारमान वाढणे आणि बाहेर उष्णता असूनही बैठककक्षात गारवा जाणवणे : ‘ब्रह्मोत्सवाचे प्रक्षेपण पहाण्यासाठी आमच्या घरी साधक आणि हितचिंतक असे एकूण २० जणांच्या बैठक व्यवस्थेचे नियोजन होते. त्या वेळी ‘बसण्याची अडचण येऊ शकते’, असे मला वाटत होते; परंतु ‘कार्यक्रमाच्या पूर्वी बैठक व्यवस्था पूर्ण झाल्यावर बैठक कक्षाचे आकारमान वाढले आहे’, असे मला जाणवले. त्या दिवशी ४४ अंश तपमान होते आणि वातानुकूल यंत्रणा नसतांनाही बैठक कक्षात गारवा जाणवत होता. येणार्या जिज्ञासूंनाही सभागृहात पुष्कळ गारवा असल्याचे जाणवत होते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक ६.६.२०२४)
|