उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेले दैवी बालक, तसेच कुमार आणि किशोर वयीन साधक यांच्यामध्ये होणारे पालट अन् त्यांची गुणवैशिष्ट्ये प्रतिवर्षी लिखित स्वरूपात ‘जिल्हा समन्वयकां’कडे पाठवा !

दैवी बालकांच्या पालकांनी प्रतिवर्षी आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या १ मास अगोदर ‘आपल्या मुलामध्ये वर्षभरात कोणते पालट झाले ? याविषयीचे लिखाण जिल्ह्यातील ‘जिल्हा समन्वयका’कडे लिहून पाठवावे.

हिंदु राष्ट्र-स्थापनेकरता ‘आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार व्हावा’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा संकल्प कार्यरत झाल्याने या कार्यात तळमळीने सहभागी होणार्‍यांवर त्यांची अपार कृपा होणार असणे

साधकांनी ग्रंथकार्य गतीने होण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले, तर संकल्पाचे फळ साधकांना मिळणार आहे, म्हणजेच साधकांची आध्यात्मिक उन्नती गतीने होणार आहे.

अयोध्या येथे श्रीराममंदिराचे पुनर्निर्माण होतांना साधकांनी साधनावृद्धीसाठी करायचे प्रयत्न !

‘२२.१.२०२४ या दिवशी अयोध्या येथे श्रीराममंदिराचे पुनर्निर्माण आणि श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा मोठा दिव्य सोहळा होत आहे. या दिवशी भारतखंडामध्ये सर्वत्र उत्सव साजरा करण्यात येईल. त्या दिवशी ‘साधनेच्या दृष्टीने कसे प्रयत्न करू शकतो ?’, याविषयी सूत्रे येथे दिली आहेत.

हिंदु स्त्रियांनो, मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत होणार्‍या हळदी-कुंकू समारंभात सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने वाण म्हणून द्या !

सनातन संस्थेने अध्यात्मशास्त्र, साधना, आचारधर्म, बालसंस्कार, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आदी नानाविध विषयांवरील ग्रंथसंपदा प्रसिद्ध केली आहे. त्यातील ग्रंथ आणि लघुग्रंथ वाण म्हणून दिल्यास अधिकाधिक जणांपर्यंत ते अमूल्य ज्ञान पोचेल.

‘मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ, तसेच उत्पादने वाण म्हणून देणे’, ही चिरंतन आणि सर्वाेत्तम भेट असल्याने त्यासाठी जिज्ञासूंना प्रवृत्त करा !

साधकांनी वाचक, जिज्ञासू, महिला मंडळे, तसेच बचत गट आदींना लवकरात लवकर संपर्क करून सात्त्विक वाण देण्याचे महत्त्व सांगावे

साधकांनो, बालसाधक किंवा साधक यांची छायाचित्रे काढतांना पुढील बारकावे लक्षात घ्या !

छायाचित्रे पाठवतांना केवळ एकच छायाचित्र न पाठवता २ – ३ छायाचित्रे पाठवावीत. जेणेकरून त्यातून योग्य छायाचित्र निवडून घेता येईल. ‘छायाचित्रे कधी काढली आहेत’, याचाही धारिकेत उल्लेख करावा.’

भीषण आपत्काळ आरंभ होण्यापूर्वीच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीच्या कार्यात सहभागी होऊन शीघ्र ईश्वरी कृपेस पात्र व्हा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांतील ज्ञानाने समाज सात्त्विक (साधक) होऊन तो हिंदु राष्ट्रासाठी पोषक होणार आहे.

सर्व साधकांसाठी सप्तर्षींचा संदेश !

प्रतिदिन सकाळी उठल्यावर दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जोरात घासावे, जेणेकरून दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये उष्णता निर्माण होईल. त्यानंतर दोन्ही हातांच्या तळव्यांकडे पाहून श्रीविष्णूचे स्मरण करून ११ वेळा ‘हरि ॐ निसर्गदेवो भव वेदम् प्रमाणम्’ हा मंत्र म्हणावा.

अयोध्येतील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्त स्थानिक स्तरावर मंदिर स्वच्छता उपक्रमाचे आयोजन करा !

प्रभु श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर १५ ते २१ जानेवारी २०२४ या सप्ताहात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील स्थानिक मंदिरांची स्वच्छता करावी आणि हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा घ्यावी.

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी अनुभूती, शिकायला मिळालेली सूत्रे इत्यादी लिखाण अल्प शब्दांमध्ये लिहून पाठवा !

साधक साधना करत असतांना त्यांना आलेल्या अनुभूती, शिकायला मिळालेली सूत्रे, अन्य साधकांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये इत्यादी दैनिकात प्रसिद्ध करण्यासाठी पाठवत असतात. साधकांचे हे लिखाण विस्तृत स्वरूपात असते.