कालमहात्म्यानुसार २०२४ मध्ये नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढणार असल्याने सनातनच्या सर्व साधकांनी प्रतिदिन पुढील आध्यात्मिक स्तरावरील उपाय करावा.
प्रतिदिन सकाळी उठल्यावर दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जोरात घासावे, जेणेकरून दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये उष्णता निर्माण होईल. त्यानंतर दोन्ही हातांच्या तळव्यांकडे पाहून श्रीविष्णूचे स्मरण करून ११ वेळा ‘हरि ॐ निसर्गदेवो भव वेदम् प्रमाणम्’ हा मंत्र म्हणावा. कधी मुंगी, तर कधी हत्ती, कधी पक्षी तर कधी प्राणी अशा कोणत्याही रूपात आम्ही सप्तर्षी साधक हा मंत्रजप करत आहेत ना ? याकडे लक्ष ठेवू.
– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, ०७.०१.२०२४)