दैनिक ‘सनातन प्रभात’मधून साधक किंवा बालसाधक यांचे लिखाण प्रसिद्ध करतांना त्यासमवेत संबंधितांची छायाचित्रेही प्रसिद्ध केली जातात. बर्याच वेळा ही छायाचित्रे योग्य पद्धतीने काढली नसल्याने ती प्रसिद्ध करता येत नाहीत आणि योग्य छायाचित्रे मिळवण्यासाठी सेवेतील साधकांना पुष्कळ वेळ द्यावा लागतो. यापुढे साधकांनी छायाचित्रे काढतांना पुढील सर्व बारकावे लक्षात घ्यावेत आणि योग्य छायाचित्रांसह लिखाण पाठवावे.
१. बालसाधक
अ. बालसाधकांचे लिखाण पाठवतांना काही पालक पाल्याला मुद्दाम वेगळा पोशाख घालून त्याचे छायाचित्र काढतात. काही पालक असात्त्विक कपडे परिधान केलेले छायाचित्र पाठवतात. बालकांना भडक रंगाचे, तसेच चित्रविचित्र आणि बटबटीत नक्षी असलेले कपडे घालू नयेत. त्यांना सात्त्विक रंगाचे आणि नेहमीचे कपडे घालावेत. मुलींना ‘फ्रॉक’ किंवा परकर-पोलके, तसेच मुलांना कुर्ता किंवा सात्त्विक रंगाचा सदरा घालू शकतो.
आ. मुला-मुलीचे केस विस्कटलेले नसावेत. ते व्यवस्थित विंचरून केसांचा भांग पाडावा. मुलीचे केस मोठे असल्यास तिच्या केसांच्या दोन वेण्या किंवा एक वेणी घालावी.
इ. बालकाच्या डोळ्यांमध्ये काजळ घालू नये. छायाचित्रात बालकाची दृष्टी सरळ असावी. छायाचित्र काढतांना बालकाला समोर छायाचित्रकाकडे (कॅमेर्याकडे) बघायला सांगावे.
ई. बालकाच्या कपाळावर नाम (उभा टिळा) लावू शकतो, तसेच बालिकेच्या कपाळावर कुंकू लावू शकतो.
उ. छायाचित्र काढतांना मुला-मुलीचा चेहरा हसरा असावा.
२. साधिका
अ. केवळ चेहराच दिसेल, असे छायाचित्र काढू नये. छायाचित्रात चेहर्यापासून आणि अनाहत चक्रापर्यंतचा (छातीइतका) भाग हवा.
आ. साधिकेने भडक रंगाचा पोशाख न घालता सात्त्विक रंगाचा पोशाख घालावा. पंजाबी पोशाख घातला असल्यास ओढणी व्यवस्थित घेतलेली असावी. ती पसरून घेऊ नये.
इ. साधिका विवाहित असेल, तर तिने गळ्यात घातलेले मंगळसूत्र पदराच्या वर व्यवस्थित दिसेल, असे असावे. अविवाहित साधिका गळ्यात ‘चेन’सारखा दागिना घालू शकतात.
३. साधक
अ. साधकांनी भडक रंगाचा किंवा रंगीबेरंगी सदरा न घालता सात्त्विक रंगाचा सदरा घालून छायाचित्र काढावे.
आ. सदरा पारदर्शक, तसेच चुरगळलेला नसावा.
४. सामाईक सूत्रे
अ. छायाचित्र काढतांना मागील पार्श्वभूमी गडद रंगाची न निवडता फिकट रंगाची निवडावी.
आ. छायाचित्रे दिवसा आणि उजेडात काढावीत. छायाचित्र काढतांना तोंडावर सावली येणार नाही, याकडे लक्ष द्यावे.
इ. छायाचित्र काढतांना बालक किंवा साधक यांची दृष्टी समोर असावी. त्यांचे दोन्ही कान आणि खांदे सरळ असावेत. छायाचित्रात त्यांचे दोन्ही खांदे पूर्ण दिसावेत.
ई. चष्मा घालणारे साधक आणि साधिका यांच्या चष्म्यावर प्रकाश पडणार नाही, याची काळजी घ्यावी.
उ. केस विस्कटलेले नसावेत. केसांना तेल किंवा पाणी लावून ते व्यवस्थित विंचरून छायाचित्र काढावे.
ऊ. एक हसरे आणि एक स्मितहास्य केलेले छायाचित्र काढावे.
‘छायाचित्रे कशा पद्धतीने हवीत’, याविषयीचे नमुने समवेत दिले आहेत. साधकांनी त्याप्रमाणे छायाचित्रे काढून ती लिखाणासमवेत पाठवावीत.
महत्त्वाची सूचना
छायाचित्रे पाठवतांना केवळ एकच छायाचित्र न पाठवता २ – ३ छायाचित्रे पाठवावीत. जेणेकरून त्यातून योग्य छायाचित्र निवडून घेता येईल. ‘छायाचित्रे कधी काढली आहेत’, याचाही धारिकेत उल्लेख करावा.’
– संकलन विभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.१.२०२४)