दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी अनुभूती, शिकायला मिळालेली सूत्रे इत्यादी लिखाण अल्प शब्दांमध्ये लिहून पाठवा !

‘साधक साधना करत असतांना त्यांना आलेल्या अनुभूती, शिकायला मिळालेली सूत्रे, अन्य साधकांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये इत्यादी दैनिकात प्रसिद्ध करण्यासाठी पाठवत असतात. साधकांचे हे लिखाण विस्तृत स्वरूपात असते. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक वार्ता, तसेच राष्ट्र अन् धर्म जागृतीपर लिखाण अन् वाचकांच्या प्रतिक्रिया इत्यादी लिखाण प्रसिद्ध करण्यात येते. त्यामुळे साधकांच्या अनुभूती, शिकायला मिळालेली सूत्रे इत्यादी प्रसिद्ध करण्यास मर्यादा येतात. साधकांनी त्यांचे लिखाण अल्प शब्दांमध्ये लिहून पाठवावे. त्यामुळे अधिकाधिक साधकांचे लिखाण प्रसिद्ध करता येईल.’

– संपादक, ‘सनातन प्रभात’  (१८.१०.२०२३)